नवी दिल्ली -भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या BSF ट्विटर हँडलचे बनावट अकाऊंट एक बनावट ट्विटर Fake account twitter handle खाते हटविण्यात आले आहे. केंद्राने त्यासंदर्भात तथ्य तपासणी युनिटला त्यासंदर्भात कार्यान्वित केले होते. सीमा रक्षक दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. @BsfIndia0 नावाचे बनावट ट्विटर हँडल अकाऊंट बनवून बीएसएफचे अधिकृत ट्विटर खाते म्हणून हॅकर्स तोतयागिरी करत होते. हे खाते बीएसएफच्या अधिकृत ट्विटर हँडल @BSF_India सारखे दिसत होते.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या I&B अंतर्गत तथ्य तपासणी युनिटने ते बनावट खाते घोषित केल्यानंतर 24 तासांच्या आत ते ट्विटर हँडल हटवण्यात आले आणि बीएसएफने ट्विटरला या बनावट खात्यावर त्वरित कारवाई करून ते तातडीने काढण्यासाठी पत्र लिहिले.
बीएसएफच्या खऱ्या ट्विटर हँडलची तोतयागिरी करणाऱ्या बनावट खात्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मंगळवारी ट्विटरला पत्र लिहिले. हे हँडल खाली आणण्यास सांगण्यात आले. आम्ही ट्विटरला लिहिल्यानंतर काही वेळातच बनावट ट्विटर हँडल हटवण्यात आले, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.