महाराष्ट्र

maharashtra

शेतकरी आंदोलनावर टि्वट करणाऱ्या रिहानाच्या हातात पाकचा झेंडा?

रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यात तीने पाकिस्तानचा झेंडा हातात पकडल्याचे दिसत आहे. या छायाचित्रामागील सत्य आपण पडताळून पाहूया.

By

Published : Feb 5, 2021, 4:09 PM IST

Published : Feb 5, 2021, 4:09 PM IST

रिहानाच्या हातात पाकचा झेंडा?
रिहानाच्या हातात पाकचा झेंडा?

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनावर टि्वट केल्यानंतर बारबाडोसची प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना चर्चेत आली आहे. काही लोकांनी रिहानाचे समर्थन केले आहे. तर काहींना तिला सडेतोड उत्तर देत भारताच्या अतंर्गत प्रकरणात दखल देण्याचा सल्ला दिला आहे. यातच रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यात तीने पाकिस्तानचा झेंडा हातात पकडल्याचे दिसत आहे. या छायाचित्रामागील सत्य आपण पडताळून पाहूया.

हा खोटा फोटो!

काय सत्य -

रिहाना एका क्रिकेट स्टेडियममध्ये उभी आहे आणि तिच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. मात्र, हे सत्य नाही. तो फोटो 2019 मधील असल्याच समोर येत आहे. रिहानाने 2019 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीज टीमला पाठिंबा दिला होता. सध्या व्हायरल झालेले छायाचित्र एडिटिंग केलेल आहे. एडिटिंग करून रिहानाच्या हातातला वेस्ट इंडिजचा झेंडा हटवून त्या जागी पाकिस्तानचा झेंडा पेस्ट करण्यात आला आहे.

हा खरा फोटो!

रिहानाचे टि्वट -

शेतकरी आंदोलनला जगभरातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप स्टार रिहाना हिने आपल्या ट्विटर हँडलद्वारे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. या टि्वटमध्ये आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने 'आपण याबद्दल का बोलत नाही' असा प्रश्न विचारला आहे. रिहानाचे हे ट्विट आता आंतरराष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनले आहे. सरकारचे सर्वोच्च मंत्री आणि अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सरकारच्या बाजूने उभे राहिलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

काय प्रकरण ?

सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे. तसेच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली आहे. या प्रकरणी अनेकांनी सरकारला सवाल केले असून शेतकरी आंदोलनला पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे

ABOUT THE AUTHOR

...view details