महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Morbi bridge : गर्भवती महिलेचा मृत्यू पाहून मन हेलावले... मोरबी दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले अनुभव - मोरबी पूल दुर्घटना

गुजरातमधील मोरबी येथे रविवारी झालेल्या अपघाताचे हृदयद्रावक दृश्य समोर (Eyewitnesses on Cable bridge collapses at Morbi) आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते. पण, ते असहाय होते. त्यांच्या डोळ्यासमोर अनेक लोक मरणात गुरफटले (Cable bridge collapses at Morbi in Gujarat) होते.

Cable Bridge Collapses
केबल पूल दुर्घटना

By

Published : Oct 31, 2022, 10:36 AM IST

Updated : Oct 31, 2022, 10:54 AM IST

मोरबी (गुजरात) : गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या हृदयद्रावककेबल पूल दुर्घटनेत मृतांची संख्या १३२ वर पोहोचली (Eyewitnesses on Cable bridge collapses at Morbi) आहे. अपघातावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते. पण, ते असहाय होते. त्यांच्या डोळ्यासमोर लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रत्यक्षदर्शींची व्यथा खूपच वेदनादायी (Cable bridge collapses at Morbi in Gujarat) असते.

लोक केबलला लटकत होते :एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की - मी तिथे दर रविवारी चहा विकतो. लोक केबलला लटकत होते आणि नंतर खाली पडले. मी रात्रभर लोकांना मदत केली, या घटनेनंतर झोपू शकलो नाही. 7 ते 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू होत असल्याचे पाहून मन हेलावले. आयुष्यात अशी घटना यापूर्वी केव्हा पाहिली (Cable bridge collapses at Morbi) नाही.

वर्णन करणे कठीण :महिला प्रत्यक्षदर्शी हसीना म्हणाली, मी त्या घटनेचे शब्दात वर्णन करू शकत नाही. पुलावर मुलेही होती. मी माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्या लोकांना मदत केली. मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी मी माझे वाहनही दिले. प्रशासनानेही मदत केली. असा अपघात मी यापूर्वी कधीच पाहिला (Cable bridge collapses) नव्हता.

132 जणांचा मृत्यू :गुजरातच्या मोरबीमध्ये रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे मच्छू नदीवर बांधलेला प्रसिद्ध केबल पूल अचानक कोसळला. हा पूल तुटल्याने शेकडो लोक नदीत पडले. या अपघातात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याचबरोबर 177 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. यासोबतच १९ जणांवर उपचार सुरू आहेत. बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या तीन टीम घटनास्थळी आहेत. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांची संख्या अधिक आहे. हवाई दलाचे गरुड कमांडोही बचावकार्यासाठी पाठवण्यात आले (Eyewitnesses on Cable bridge collapses in Gujarat) आहेत.

Last Updated : Oct 31, 2022, 10:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details