मंगळुरू (कर्नाटक): Extortion bid: येथील सुरतकल पोलिसांनी हिंदू महासभेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष राजेश पवित्रन Hindu Mahasabha leader Rajesh Pavithran यांना सोने आणि रोख रकमेची मागणी पूर्ण न केल्यास त्याची खासगी माहिती सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. Hindu Mahasabha leader held
Extortion bid: खंडणीची मागणी करणारा हिंदू महासभेचा नेता अटकेत - हिंदू महासभा नेते राजेश पवित्रण
Extortion bid: सोने आणि रोख रकमेची मागणी पूर्ण न केल्यास खासगी माहिती सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या कर्नाटक हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. Hindu Mahasabha leader held
कोवूर येथील रहिवासी असलेल्या सुरेशने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी आणि पवित्रन यांनी सुरतकल येथे भागीदारी तत्त्वावर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर, पवित्रनच्या संशयास्पद व्यावसायिक सौद्यांची अधिक माहिती मिळाल्यानंतर, त्याने त्याचा निर्णय मागे घेतला.
त्यामुळे संतप्त झालेल्या पवित्रनने सुरेशचा लॅपटॉप गुपचूप काढून घेतला आणि सोन्याचे व रोख रकमेची मागणी मान्य न केल्यास त्याची खासगी माहिती संगणकात सार्वजनिक करण्याची धमकी दिली. आरोपीने त्याचे हातपाय कापण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.