मुंबईबॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक Bollywood film director मुश्ताक नाडियादवाला Mushtaq Nadiadwala यांनी मुंबई उच्च न्यायालयात High Court Mumbai याचिका दाखल करत पाकिस्तानात अडकलेली Stuck in Pakistan आपली पत्नी, 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांना तात्काळ भारतात आणण्याची मागणी केली होती. नाडियादवालांनी आरोप केला होता की, आपली पत्नी आणि मुले परत मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय Ministry of External Affairs तथा गृह विभागाशी संपर्क केला होता. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नव्हते. असे आरोप याचिकेतून करण्यात आला होते. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सुनावणीदरम्यान असे सांगितले गेले की, चित्रपट दिग्दर्शक मुश्ताक नाडियादवाला Mushtaq Nadiadwala मदतीसाठी संयुक्त सचिवांशी संपर्क साधू शकतात.
काय आहे प्रकरणमुश्ताक नाडियादवाला यांनी पाकिस्तानी नागरीक Pakistani citizens असलेल्या मरियम चौधरी Maryam Chaudhary यांच्याशी साल 2012 मध्ये विवाह केला. कालांतराने मरियम यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये मरियम Maryam Chaudhary आपल्या आजारी पालकांना भेटण्यासाठी दोन्ही मुलांसह पाकिस्तानला गेल्या. पण, अचानक फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या मुलांच्या एकल पालकत्वासाठी लाहोर कोर्टात मरियम यांनी याचिका दाखल केली आणि कोर्टानं ती मान्यही केली. अचानक आपल्या बायकोचं हे मतपरिवर्तन का झालं, याची कल्पना नसल्याचं नाडियादवाला म्हणतात. मरियमचे आईवडील तिथले वजनदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांनीच तिचं ब्रेनवॉश केलं असावं असा आरोप या याचिकेतून नाडियादवाला यांनी केला आहे.