महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

S Jaishankar : 'टाळी वाजवायला दोन हात लागतात..', भारत-चीन संबंधांवर परराष्ट्र मंत्री म्हणाले..

भारत आणि चीनमधील तणाव चीनमुळे निर्माण झाला असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. तसेच राजनैतिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी परस्पर प्रयत्न केले पाहिजे, असे ते म्हणाले.

S Jaishankar
एस जयशंकर

By

Published : Jun 30, 2023, 10:47 PM IST

कोलकाता : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी भारत - चीन परराष्ट्र संबंधांवर भाष्य केले. ते म्हणाले की, 'टाळी वाजवायला दोन हात लागतात. चीनकडूनही संबंध सुरळीत करण्यासाठी हालचाल व्हायला हवी'. सध्याचा दोन राष्ट्रांमधील तणाव भारतामुळे निर्माण झाली नाही, असेही जयशंकर म्हणाले.

'चीनमुळे दोन देशांत तणाव' : कोलकाता येथे बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणाले की, 'प्रमुख देशांमधील संबंध परस्पर हितसंबंध, संवेदनशीलता आणि आदर यावर आधारित असतात. हे चीनला समजले पाहिजे'. जयशंकर यांनी नमूद केले की, द्विपक्षीय संबंधांमध्ये सध्याचा तणाव चीनने 1993 आणि 1996 मधील करारांचे उल्लंघन केल्यामुळे, विशेषत: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे (एलएसी) सैन्य हलवल्यामुळे निर्माण झाला आहे.

'दोन्ही बाजूंनी प्रयत्न आवश्यक' : जयशंकर पुढे म्हणाले की, 'आमच्या संबंधांमधील सध्याची घसरण ही आमच्यामुळे निर्माण झाली नाही. ती चीनने निर्माण केली होती. राजनैतिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी परस्पर प्रयत्न केले पाहिजे. चीनने एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे थांबवणे आवश्यक आहे.' परराष्ट्र मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, ' आता जर आपल्याला उत्तम संबंध ठेवायचे असतील तर त्यांनी त्या करारांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे थांबवले पाहिजे. त्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की, दोन देशांमधील संबंध तेव्हा कार्य करतात, जेव्हा ते परस्पर स्वारस्य, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर आदर यावर आधारित असतात. त्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यांना हे समजावे असा माझा प्रयत्न आहे'.

'चीनने भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले' : परराष्ट्र मंत्र्यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की, चीनने केलेली सर्वात हानीकारक कृती म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन होते. जयशंकर म्हणाले, 'आमच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनामुळे आमच्या हितसंबंधांना अधिक धक्का बसला आहे. ते उल्लंघन चीनने केले आहे. हे 1963 मध्ये सुरू झाले आणि त्यानंतर वाढतच गेले.' भारत आणि चीनमधील संबंध एप्रिल 2020 पासून तणावाचे आहेत. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात आहे. भविष्यात चीनकडून होणार्‍या संभाव्य गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी भारताने पूर्व लडाख सेक्टरमध्ये बरेच सैन्य तैनात केले आहे.

हेही वाचा :

  1. PM Modi US Visit : भारत-अमेरिकेतील 'हे' पाच मोठे संरक्षण करार चीन, पाकिस्तानची झोप उडवतील! जाणून घ्या
  2. Eastern Ladakh Row : भारत चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर झाली चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details