गोवा: पक्षाविरोधात (Goa Congress Party) बंड करून पक्षातील सहयोगी आमदारांना भाजप सोबत जाण्यासाठी दबाव आणल्याच्या आरोपावरून, काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर (Congress president Amit Patkar) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते दिगंबर कामत (Congress leader Digambar Kamat) यांची पक्षाच्या कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य पदावरुन हाकलपट्टी केली आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी नुकताच पक्षाविरोधात बंड करून पक्षातील इतर आमदारांना भाजप मध्ये नेण्यासाठी आमिष दाखवले होते. यावरून प्रचंड राजकारण झालं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षही टीकेचा बळी ठरला होता. याचाच ठपका ठेवून कामत यांची पक्षाच्या स्थायी निमंत्रित कायमस्वरूपी निमंत्रित पदावरनं पक्षाने हकलपट्टी केली. पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही कारवाई केली.
पक्षातून निलंबित व आमदारकी रद्द करण्याचे विधानसभा अध्यक्षांना पत्र:पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून अमित पाटकर यांनी दिगंबर कामत व मायकल लोबो यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.