नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील लोकांसाठी पुरेसा साठा न ठेवता लस निर्यात केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या सरकारने 70 वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लस निर्यात करणारा देश आता लसीची आयात करत आहेत. सध्याच्या सरकारने 70 वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. यूपीमध्ये, गेल्या 10 दिवसांत संक्रमण वेगाने वाढले आहे. आता कोरोनाचा प्रसार खेड्यातही होत आहे. शहरांमध्ये चाचण्यांची कमतरता आहे. आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. लखनऊ, नोएडा, गाझियाबाद, बनारस, अलाहाबाद येथेही चाचणी करण्यासाठी लोक प्रतीक्षेत आहे. जर हा प्रदेश वाचवायचा असेल, तर जास्तीत जास्त आरटीपीसीआर करणे गरजेचे आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.