महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोठा अर्नथ टळला! जम्मूतील बस स्थानकातून विस्फोटक साहित्य जप्त - पुलवामा हल्ला लेटेस्ट न्यूज

जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठा अर्नथ टळला आहे.

पुलवामा
पुलवामा

By

Published : Feb 14, 2021, 3:49 PM IST

श्रीनगर -आजच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा दोन वर्षानंतर आजच्या दिवशी पुन्हा हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव होता. मात्र, प्रसंगावधान दाखवत पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टाळली आहे. जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठा अर्नथ टळला आहे.

जम्मूमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याने सुरक्षा दल आणखी सतर्क झाले आहे. लश्कर-ए-मुस्तफाचा दहशतवादी मलिकला अटक, सांबामध्ये सुरंग आणि हत्यारे आढळल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, दहशतवाद्यांनी दहशतवादी कारवाया वाढवल्या आहेत.

देशाच्या इतिहासातील काळा दिवस -

आजच्याच दिवशी 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या 40 जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधील काळा दिवस आहे. सीआरपीएफ जवानांच्या ७८ गाड्यांचा ताफा जम्मूवरून श्रीनगरला जात होता. यावेळी पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details