महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोट; सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासह जवानाला वीरमरण - नियंत्रण रेषेवर स्फोट

सुरक्षा दलांकडून वाढता दबाव आणि जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे, दहशतवादी आता त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. या अंतर्गत सुमारे 200 लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सुरक्षा दल
सुरक्षा दल

By

Published : Oct 30, 2021, 9:51 PM IST

राजौरी - जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नौशेराच्या परिसरात शनिवारी दुपारी नियंत्रण रेषेवर स्फोट झाला. या स्फोटात सैन्यदलाचा एक अधिकारी आणि सैनिकाला वीरमरण आले आहे. ही माहिती सैन्यदलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद संपविण्यासाठी पोलस आणि सुरक्षा दलाकडून सातत्याने मोहिम राबविण्यात येत आहे. एनआयएने 2017 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविणाऱ्या सहाहून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून नागरिकांच्या झालेल्या हत्यांप्रकरणाचीही एनआयएकडून चौकशी करत आहे. या प्रकरणांमध्ये 13 लोकांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने गेल्या चार महिन्यांत जम्मू काश्मीरमध्ये 130 छापे मारले आहेत.

हेही वाचा-दहशतवाद्यांची मुंबई लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची होती तयारी - मुंबई एटीएस

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्याचे षडयंत्र

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी सामान्य लोकांना लक्ष्य करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे. सुरक्षा दलांकडून वाढता दबाव आणि जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे, दहशतवादी आता त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. या अंतर्गत सुमारे 200 लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सरकारशी जवळीक असणारे, माध्यम व्यक्ती, काश्मिरी पंडित आणि सुरक्षा दलांच्या संपर्कात असलेले लोक आहेत. बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे.

हेही वाचा-ईडीसह किरीट सोमैयांना काश्मीरला पाठवा, दहशतवादी पळून जातील -संजय राऊत

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी सरकारच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र रचत आहेत. याशिवाय आरएसएस आणि भाजपाशी संबंधित लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर इतर राज्यांच्या लोकांनाही विनाकारण लक्ष्य केले जात आहे. गेल्या वर्षी ISI ने लष्करसाठी The Resistance Front (TRF) नावाची संघटना स्थापन केली होती. आता याच संघटनेने काश्मीरमधील बहुतेक हल्ल्यांचा दावा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details