Istanbul Blast: इस्तंबूलमधील इस्तिकलाल पादचारी रस्त्यावर स्फोट; चौघांचा मृत्यू, तर 11 जखमी - Blast in Istanbul
तुर्की (इस्तांबुल) - मध्य इस्तंबूलमधील इस्तिकलाल पादचारी रस्त्यावर झालेल्या स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या बॉम्बस्फोटात 38 लोक जखमी झाले आहेत तर 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे.

तुर्की (इस्तांबुल) - तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये आज रविवार (13 नोव्हेंबर)रोजी बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या बॉम्बस्फोटात 38 लोक जखमी झाले आहेत तर 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दिसत आहेत. दुकाने बंद असून रस्तेही बंद करण्यात आले आहेत. अनाडोलू एजन्सीने सांगितले की, स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही. स्फोटानंतर इस्तंबूलच्या गजबजलेल्या भागात गोंधळाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या स्फोटाची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.