ईटीव्ही भारत - पतंजलीने ज्याप्रकारे देशात ब्रँड बनवला आहे. हा योगगुरू बाबा रामदेव यांचा चमत्कार आहे कि आक्रमक मार्केटींगचा परिणाम?
बाबा रामदेव - हे यश सामूहिक प्रयत्नातून मिळाले आहे. देशातील करोडो लोकांना आमच्यावर विश्वास आहे. आम्ही विदेशी कंपनीच्या एकाधिकार शाहीला मोडीत काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. आमच्या सोबत अनेक क्रिकेटर आणि सेलेब्रेटी आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही पतंजलीच रिच वाढवतो आहे.
ईटीव्ही भारत - तुम्ही रुची सोयाचा आयपीओ आणणार आहे, तो केंव्हा येईल?
बाबा रामदेव-आमच्याकडे गुंतवणूकदार लाईन लावून उभे आहेत. अनेक जण रुची सोयामध्ये पैसे गुंतवायला तयार आहे. लोकांमध्ये विश्वास वाढला आहे. हीच आमची आतापर्यंतची कमाई आहे. आम्ही याला खेळ मानत नाही. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर डिलीव्हरी करणार आहोत.
ईटीव्ही भारत - आयपीओ केंव्हा येणार आहे आणि सेबीमध्ये काय स्थिती आहे?
बाबा रामदेव - आम्ही सेबीमध्ये डीआरएस फाईल केला आहे. लवकरच तेथून फाईल क्लियर होऊन येईल, अशी अपेक्षा आहे. आयपीओ पूर्ण पारदर्शकपणे येईल. रुची सोयामध्ये कोणाताही वाद नसेल. लवकरच प्रक्रिया पूर्ण करून आम्ही आयपीओ बाजारात आणणार आहे.
ईटीव्ही भारत - रुची सोयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. तुम्ही आयपीओची आणण्याचे म्हणाता आहात. आज बाजारात अॅनालिस्ट संशय व्यक्त करत आहे, कारण रुची सोयामध्ये अद्यापही प्रमोटर्सची होल्डिंग 98 टक्के आहे. सामान्य नागरिक टक्केवारीला घाबरतो. काय सांगाल?
बाबा रामदेव- आम्ही 100 टक्के शेयर आमच्याकडे ठेवू शकलो असतो. मात्र, ज्यांनी यामध्ये पैसे लावले होते. त्यांना उत्तम परतावा मिळायला हवा, यासाठी आम्ही असे नाही केले. ज्या लोकांनी येथे पैसे लावले. त्यांच्या एका टक्क्यालाही मुल्य मिळाले आहे. पूर्वी सात रुपयाचा शेयर होता. आता शेयरची किंमत वाढली आहे. यामध्ये गुंतवणूकदार आणि कंपनीचे हित आहे. यात स्वामी रामदेवचे कोणतेही हित नाही.
ईटीव्ही भारत - इंधनाच्या वाढत्या किंमतीची चर्चा होत आहे. मात्र, वाढत्या खाद्य तेलाच्या किंमतीची चर्चा होत नाही. त्यामुळे रुची सोया सारख्या एफएमसीजीची भूमिका महत्त्वाची होते. काय सांगाल?
बाबा रामदेव- आपण आत्मनिर्भार नाही, त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. एडिबल ऑयल क्षेत्रात आपण लवकरच आत्मनिर्भर होऊ. कोरोनाकाळात महागाईमुळे जनता परेशान आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळात एडिबल ऑयल क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होऊ, असे आश्वासन देतो.
ईटीव्ही भारत - तुम्ही आता म्हटले की सरकारने उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, तुमच्यामते सरकारने काय करायला हवे?
बाबा रामदेव-सरकारने महागाई कमी करण्यासाठी कठोर पावले उचलावी. यासाठी योग्य ती योजना बनवावी. आम्ही अपेक्षा करतो करतो की सरकार लवकरच याविषयी योग्य तो निर्णय घेतील.
ईटीव्ही भारत -तुम्ही एका मुलाखतील म्हटले होते कि 2025 पर्यंत पतंजली एफएमसीजीमध्ये देशातला नंबर वन ब्रँड होईल. हे हिंदुस्थान लिव्हरसाठी आव्हानात्मक नाही का? काय तुम्ही हिंदुस्थान लिव्हर सारख्या अन्य कंपन्या घेण्याच्या तयारीत आहात?
बाबा रामदेव- आम्ही 99 टक्के कंपन्यांना मागे सोडले आहे. फक्त एकच कंपनी आमच्या पुढे आहे. आम्ही कोणतेच बेकायदेशीर काम करणार नाही. आमचा कंज्यूमर बेस यूनिलिव्हरपेक्षा मोठा आहे. आम्ही कॉस्टेटिक आणि वेलनेसवर करतो आहे.