देहरादून -आगामी विधानसभा निवडणूक 2022 च्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाहे हरिद्वारच्या दौऱ्यावर ( JP Nadda Haridwar visit ) आले होते. या दौऱ्यात त्यांनी विजय संकल्प यात्रेला हिरवा झेंडा ( BJP national president starts Sankalp Yatra ) दाखविला. हरिद्वारमधील पंचदीप पार्किंगमधील कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर हरिद्वारमधून रोड शो काढण्यात ( JP Nadda road show in Haridwar ) आला. यावेळी जे. पी. नड्डा यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
विजय संकल्प रथात सहभागी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. ते म्हणाले, की हा मोठा जनसमूह दाखवित आहे, की उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. निवडणुकीच्या वातावरणाची सुरुवात आहे. सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात जनसमूह दिसत आहे. उत्तराखंडमधील जनता ही मोदी यांच्या कामाला आणि डबल इंजिनच्या सरकारला समर्थन देत आहे. धामी सरकारच्या कामामुळे जनतेत उत्साह आहे.