महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kulgam Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाची मोठी कारवाई - Kulgam Encounter

काश्मीरच्या खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधील कुलगाममध्ये (Kulgam Encounter ) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत 5 दहशतवाद्यांना (Five militants killed in J&K's Kulgam) ठार करण्यात आले आहे.

Exchange of fire breaks out between militants and security forces at Kulgam in Kashmir
Kulgam Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

By

Published : Nov 18, 2021, 6:50 AM IST

श्रीनगर( जम्मू काश्मीर) - कुलगाममध्ये (Kulgam Encounter ) दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यात 5 दहशतवाद्यांना (Five militants killed in J&K's Kulgam) जवानांनी कंठस्नान घातले. यात टीआरफचा उपकमांडर अफाक सिंकदरचा समावेश आहे. तर उर्वरित दहशतवाद्यांची ऑपरेशन संपल्यानंतर ओळख पटवली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गुप्तचर संघटनांनकडून माहिती मिळाल्यानंतर कुलगामच्या पोंबई गावात पहिली चकमक झाली. यात तीन दहशतवादी ठार झाले. तर दुसरी चकमक गोपालपोरा गावात सुरू झाली. येथे TRF चा उप कमांडर अफाक सिकंदरसह दोन अतिरेकी मारले गेले. सुरक्षा दलांसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.

यापूर्वी मंगळवारी श्रीनगरच्या हैदरपोरा (Hyderpora Encounter) भागात चकमक झाली होती. या चकमकीत चार जण ठार झाले होते. या चकमकीत एक विदेशी दहशतवादी हैदर, त्याचा स्थानिक सहकारी अमीर माग्रे, नागरिक मुहम्मद अल्ताफ भट आणि दहशतवादी सहकारी डॉ मुदासीर गुल यांना ठार मारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आयजीपी काश्मीर यांनीही भट क्रॉस फायरमध्ये ठार झाल्याची कबुली दिली. मात्र, चौघांनाही उत्तर काश्मीरमधील हंदवाडा परिसरात दफन करण्यात आले.

दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातून लष्कर ए तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेच्या दोन साथीदारांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. संयुक्त नाका तपासणीदरम्यान पुलवामा पोलीस आणि सुरक्षा दलांनी अटक केलेल्या अमीर बशीर आणि मुख्तार भट अशी एलईटी दहशतवाद्यांची ओळख पटली. त्यांच्याकडून दोन आयईडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details