श्रीनगर : जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंस पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मिर प्रशासनावर आरोप केला आहे. ते म्हणाले, केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन, पोलीस दुरुपयोग करुन गुपकार आघाडीच्या विजयी उमेदवारांवर 'जम्मू-कश्मीर आपला पक्षात' सहभागी होण्यासाठी दबाव आणत आहे. श्रीनगर येथे आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकशाहीची बदनामी होतेय -
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा डीडीसी निवडणुकीच्या निकालानंतर दावा करत आहेत की, जम्मू-काश्मिरमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. मात्र, दुसरीकडे लोकशाहीची बदनामी करण्यात येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, ओमर अब्दुल्लांनी शुक्रवारीही आरोप केला होता की, डीडीसी निवडणुकीच्या निकालानंतर जम्मू-काश्मिर प्रशासन आणि पोलीस डीडीसी सदस्यांना दुसऱ्या पक्षांत जाण्यासाठी मदत करत आहेत. तसेच त्यांनी हादेखील आरोप केला आहे की, काही पक्ष आपली संख्या वाढवण्यासाठी धन, शक्ती आणि सरकारी दबावाचा वापर करत आहेत.
हेही वाचा -DECADES 2010-20 : दशकातील केंद्र सरकारची वादग्रस्त विधेयके व त्यावरून देशात झालेली आंदोलने
तर ओमर अब्दुल्लांनी यांनी केलेल्या आरोपांआधी माजी अर्थमंत्री अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वातील 'जम्मू-काश्मिर अपनी पार्टी' ने शोपियां जिल्ह्यात इमाम साहिब-1 पासून जिला विकास परिषद (डीडीसी) सदस्य यासमीन जान यांच्या आपल्या पक्षात सहभागी होण्याची घोषणा केली होती. यासमीन जान यांनी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाद्वारे निवडणूक लढवली होती.