पणजी -भाजपाचे दिग्गज नेते मायकल लोबो यांनी भाजपाला रामराम करत कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंड पुकारल्यानंतर या मतदारसंघात आता चांगलीच सुरस दिसते आहे. गोव्यातील कळंगुट समुद्रकिनारा हा अतिशय प्रसिद्ध आहे. पर्यटकांनी नेहमी गजबजलेला कळंगुट परिसर आता निवडणुकीच्या रणधुमाळीत तापला आहे. कळंगुट मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत असलेले भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात सामील झाले. मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला असल्याने मायकल लोबो यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कळंगुट मतदार संघातील मतदार नेहमीच एकाच पक्षाला संधी देत नाहीत. दर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांची अदलाबदल होताना दिसते.
- मतदार संघाची रचना
कळंगुट मतदारसंघात हडफडे नागवा, कांदोळी, कळंगुट आणि पर्रा या चार पंचायतींचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण पंचवीस हजार पाचशे मतदारांची नोंद झालेली आहे. यापैकी बारा हजार चारशे पुरुष तर १३ हजार शंभर महिला मतदार आहेत. या मतदारसंघातील आजवरचा इतिहास पाहता मायकल लोबो यांचे वजन जास्त आहे. या मतदार संघातील प्रस्थापितांना धक्का देत त्यांनी आपलं वलय निर्माण केले आहे.
- लोबो यांच्याविरोधात सिक्वेरा