पणजी - तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee in Goa) सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. गोव्यातून भाजप हद्दपार झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. गोव्यात भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली.
- मी येथे तुमचा हक्क हिरावून घेण्यासाठी आले नाही - ममता बॅनर्जी
मी येथे तुमचा हक्क हिरावून घेण्यासाठी आले नाही तर तुमची मदत करण्यासाठी आले आहे. मी देखील ब्राह्मण कुटुंबातील आहे. मला भाजपकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच गोव्यातून भाजपला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
- दिल्लीची दादागिरी चालणार नाही -
दिल्लीची दादागिरी चालणार नाही. संविधानाचा पाया मजबूत राहावा हीच आमची इच्छा आहे. गोव्यात संस्कृती आणि वारसा कायम राहावा यासाठी संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचा तृणमूलची इच्छा आहे. गोवेकरांची मान नेहमी उंचावून, सन्मानानं जगावं ही आमची इच्छा आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.