महाराष्ट्र

maharashtra

PM Modi In Mann Ki Baat : दररोज 20,000 कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार: पंतप्रधान मोदी

By

Published : Apr 24, 2022, 12:06 PM IST

लोकांनी 'कॅशलेस डेआऊट' (Cashless Dayout ) साठी पुढे जावे, आता लहान गावे, शहरांमध्येही लोक युपीआय वापरत आहेत. त्याचा फायदा दुकानदार आणि ग्राहकांना होत आहे. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्था विकसित (The digital economy evolved) होत आहे, दररोज 20 हजार कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार (everyday Rs.20,000 Cr online transactions) होत आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमात दिली.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:ऑनलाइन पेमेंटमुळे डिजिटल अर्थव्यवस्था विकसित होत आहे. लोकांनी 'कॅशलेस डेआऊट'साठी पुढे जावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केली. ते म्हणाले की, आता शास्त्रज्ञ 'थिअरी ऑफ एव्हरीथिंग' या विषयावर चर्चा करत आहेत. जिथे विश्वातील प्रत्येक गोष्ट आत्मसात केली जाऊ शकते. एका बाजूला आम्ही शून्याचा शोध लावला तर अनंताची कल्पनाही शोधली.

वेद आणि भारतीय गणितातील मोजणी अब्ज आणि ट्रिलियनच्या पुढे गेली आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की पाणी ही प्रत्येक जीवाची मूलभूत गरज आहे, ती एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहे. वाल्मिकी रामायणात जलसंधारणावर भर देण्यात आला होता. हडप्पा संस्कृतीच्या काळात, पाणी वाचवण्यासाठी प्रगत अभियांत्रिकी होतीअशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details