नवी दिल्ली -'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है' शांती ओम या चित्रपटातील हा डायलॉग फिल्मी आहे. मात्र, असच काहीसे घडलं आहे झारखंडच्या पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील चिमुकल्यांसोबत. कोरोना संकटात शाळा सुरू नसल्याने ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. मात्र, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल, इंटरनेटची सुविधा नाही. मोबाईल नसल्याने शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होतेयं. यासाठी झारखंडमधील रहिवासी तीन मुलांनी आंबे विकून पैसे कमवायचे आणि शिक्षणासाठी मोबाईल घेण्याचे ठरवले. त्यांच्या या प्रयत्नांची बातमी 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केली. याची दखल घेत आमदार रामदास सोरेन यांनी चिमुकल्यांना मोबाईल घेऊन दिले आहेत.
मुसाबनी ब्लॉकमधील रोआम गावातील तीन मुले रस्त्याच्या कडेला आंबे विकत बसलेली होती. शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉईड फोन खरेदी करत असल्याचे मुलांनी सांगितले. याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. त्यानंतर घाटशीलाचे आमदार रामदास सोरेन यांनी कार्यकर्त्यांना गावात पाठवले मुलांच्या पालकांना भेटून परिस्थितीची माहिती करून घेतली.