- आज या घडामोडींवर असणार नजर
मुंबई -आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषद घेणार. यात ते विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सिंहगड किल्ल्याला भेट देणार.
- कालच्या महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, तेथील लोक देश सोडून पळू लागले आहेत. त्यामुळे, आज (15 ऑगस्ट) अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून सुमारे 220 भारतीयांना दोन वेगवेगळ्या विमानांनी भारतात आणण्यात आले. मुख्यतः अफगाणिस्तानमध्ये राहणारे भारतीय हिंदू आणि शीख आहेत. वाचा सविस्तर..
काबूल (अफगाणिस्तान)-तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अराजकता आणि बिघडलेल्या परिस्थितीमुळे रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला. इतकेच नव्हे तर, राष्ट्रपती अशरफ गनी हे देश सोडला पळून गेले आहेत. सविस्तर वाचा..
काबूल -तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अराजकता आणि बिघडलेल्या परिस्थितीमुळे रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला. अशरफ गनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सरकारने इस्लामी अतिरेक्यांना शरण आल्यानंतर अली अहमद जलाली यांना नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.सविस्तर वाचा..
लेस कायेस (हैती) - हैतीमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संख्येमध्ये रविवारी वाढ झाली. किमान ७२४ नागरिकांचा मृत्यू, तर किमान २ हजार ८०० नागरिक जखमी झाले आहेत. हैतीच्या नागरिक संरक्षण कार्यालयाचे संचालक जेरी चँडलर यांनी, बचावकर्ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत, असे सांगितले. सविस्तर वाचा..
मुंबई -राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात किंचित वाढ होऊन ६६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होऊन ५७८७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी त्यात आणखी घट होऊन ४७९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. शुक्रवारी त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. शनिवारी मृत्यू संख्येत आणखी घट होऊन १३४ मृत्यूची नोंद झाली. रविवारी त्यात किंचित घट होऊन १३० मृत्यूची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवत असताना हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्यात आला. यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग आठव्या वर्षी संबोधित केले. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारत, उर्जा, जल संरक्षण, कोरोना, लसीकरण, अमृत महोत्सव, ऑलिम्पिक आदी विषयांवर भाष्य केले. सविस्तर वाचा..
- जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
16 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांसाठी आजचा दिवस सावध राहण्याचा आहे; जाणून घ्या..