- आज या घडामोडींवर असणार नजर
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करणार.
लंडन -आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस.
बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री आज कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बंगळुरू येथे तज्ज्ञांसोबत बैठक घेतील. 15 ऑगस्ट नंतर अधिक कडक नियम लागू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली.
- कालच्या महत्वाच्या बातम्या
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकार पावले उचलत आहे. 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत 15 ऑगस्टपासून हॉटेल्स, मॉल आणि रेस्टॉरेंट रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यासंदर्भात बुधवारी, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्या 15 ऑगस्टपासून हॉटेल, मॉल आणि रेस्टॉरेंटला दहा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा असणार आहे. यासोबतच आंतरराज्य प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असणार आहे. किंवा 72 तास आधी केलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे असणार आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. राज्याच्या विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबतच्या वादावरून काल मुंबई उच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केले. नामनिर्देशित जागा अनिश्चितकाळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. सविस्तर वाचा..
मुंबई -राज्यात सोमवारी ४ हजार ५०५, मंगळवारी ५ हजार ६०९, बुधवारी ५ हजार ५६० तर गुरुवारी ६ हजार ३८८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काल त्यात किंचित वाढ होऊन ६ हजार ६८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी ६८, मंगळवारी १३७, बुधवारी १६३, गुरुवारी २०८ मृत्यूची नोंद झाली होती. काल त्यात घट होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेने ठाण्यात डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आढळून आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाला कळविले आहे. यामुळे डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 66 झाली आहे. लसीचे 2 डोस घेतलेल्या 10 जणांना, तर एक डोस घेतलेल्या 8 जणांना डेल्टाची लागण झाली आहे. आतापर्यंत डेल्टा प्लसमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
जळगाव -राज्यातील मागील भाजप व विद्यमान महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दोघांच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे आरपार की लढाई असेल. मराठा समाज मूक मोर्चा काढणार नाही तर, हातात दंडूके घेवून ठोक मोर्चा काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला. सविस्तर वाचा..
नंदुरबार -जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या शून्य झाल्याने आणि शेवटच्या कोरोनाबाधितांचा मृत्यू होवून जवळपास पन्नास दिवसांहून अधिकचा कालावधी उलटल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा..
पुणे -कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील एन्टीबॉडीज कमी होतात, असा रिपोर्ट छापून आला आहे. ते खरे आहे. त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा. मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतला. मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालुन अतिशय वाईट गोष्ट केली, असे वक्तव्य सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले आहे. आज (शुक्रवारी) पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा..
- जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
'या' राशीवाल्यांसाठी आजचा दिवस संघर्षाचा; जाणून घ्या..