- आज या घडामोडींवर असणार नजर
नाशिक -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर असणार.
नवी दिल्ली - 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
- कालच्या महत्वाच्या बातम्या -
नवी दिल्ली - 127 वे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर 10 तारखेला लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..
नवी दिल्ली - भारताची राजधानी दिल्लीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान सोमवारी पार पडला. भारताला पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकून देत इतिहास रचणारा नीरज चोप्रा याच्याशिवाय, कास्य पदक जिंकणारा भारतीय पुरुष संघ, कास्य पदक विजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, कास्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, रौप्य पदक विजेता रवी कुमार दहिया यावेळी उपस्थित होते. या खेळाडूंनी आपला ऑलिम्पिकचा अनुभव सांगितला. वाचा सविस्तर..
जालना - राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत संबंधित विभाग स्वतंत्र निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. कोरोनाची परिस्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घ्यावा, अशी सूचना तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने दिली होती, अशी माहिती टोपे यांनी दिली. पाहा व्हिडिओ..
पुणे - पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानांकडून चित्तथरारक घटनेनंतर चौथ्या मजल्यावर खिडकीबाहेर लटकलेल्या 14 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये काल सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीला खाली उतरवल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. वाचा सविस्तर..