महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकीय गरमागरमी.. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची आशा, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल. ईटीवी भारत विशेष बातम्या व एक्सप्लेनरविषयी जाणून घ्या..

etv-bharat-top-news
etv-bharat-top-news

By

Published : Aug 5, 2021, 6:05 AM IST

आज या घडामोडींवर असणार नजर -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजापसून तीन दिवस मराठवाडा दौऱ्यावर; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्षाची ठिणगी!

मुंबई -राज्यपाल ५ ऑगस्टपासून तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन हॉस्टेलचे उद्घाटन तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. तर तिथेच राज्यपाल आपल्या दौऱ्यावर ठाम असल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वाचा सविस्तर

राम मंदिर भूमिपूजनला एक वर्ष पूर्ण, अयोध्येत आज दीपोत्सव

अयोध्या- श्रीराम जन्मभूमी परिसरात राम मंदिर निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपन्न झालेल्या भूमि पूजन कार्यक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त राम जन्मभूमी परिसरात धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.

मध्यप्रदेशमध्ये आजपासून नववी व दहावीचे वर्ग सुरू होणार, यूपीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये नववी व दहावीचे वर्ग आजपासून सुरू होणार आहेत. पालकांच्या परवानगीचे पत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. आठवड्यातून केवळ एक दिवस नववी व दहावीचे वर्ग भरणार आहेत. युपीमध्येही शाळांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे.

अभिनेता धनुषला त्याच्या आलिशान कारसाठी करात सूट देण्याविषयी आज न्यायालयाचा निकाल

तमिळ अभिनेता धनुषला त्याच्या आलिशान कारसाठी करात सूट देण्याबाबतच्या याचिकेवर आज न्यायालयाचा निकाल येणार आहे. आलिशान कारच्या करात सूट देण्याची मागणी अभिनेत्याने केली होती. त्यावर आज निकाल येणार आहे.

आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा शुभारंभ, मोदी करणार लाभार्थ्यांशी संवाद

लखनौ - आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यातून पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरीत केले जाईल. पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यातून लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

ऑलिम्पिकमध्ये भारताला आज कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची आशा..

हैदराबाद-टोकियो ऑलम्पिकचा आज १४ व्या दिवस आहे. कालचा दिवस भारतासाठी समिंश्र यश देणारा ठरला. लवलीनाने कांस्य पदक जिंकले तर रवि दहियाने फायनलमध्ये प्रवेश करून रौप्य पदक पक्के केले. दीपक पूनिया आणि महिला हॉकी टीमचा पराभव झाला. मात्र हे पुनिया व महला हॉकी संघ आज कांस्य पदकासाठी खेळतील. आज रवि दहियाची नजर गोल्ड मेडलवर असेल तर दीपक पूनिया आणि हॉकी टीम कांस्य पदकासाठी खेळतील.वाचा सविस्तर

म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी, आज निघणार जाहिरात

मुंबई - दोन वर्षापासून मुंबईजवळच्या म्हाडा कोकण मंडळाची घरांची सोडत लांबली होती मात्र यावर्षी या सोडतीला मुहुर्त सापडला आहे. दसऱ्याला या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची घोषणा आज दुपारी तीन वाजता होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ही घोषणा करतील. घोषणा केल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

Maratha Reservation :...तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल - अशोक चव्हाण

मुंबई - राज्याला केवळ आरक्षणाचा अधिकार देऊन काहीही होणार नाही. 102 वी घटना दुरुस्तीनंतर 50 टक्केच्या वर राज्याला आरक्षण देता येत नाही. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाबाबतची मर्यादा शिथिल केल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असे स्पष्ट मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. वाचा काय आहे प्रकरण

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

बुलडाणा - ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून नि:स्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज बुधवारी 4 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांची प्रकृती मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे अत्यवस्थ झाली होती. वाचा सविस्तर

तरुणाने दोन राज्यातील तब्बल 300 तरुणींशी ठेवले प्रेमसंबंध

कडप्पा(आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेश पोलिसांनी 300 पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. 23 वर्षीय के सी. प्रसन्ना कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये 200 तरुणी आणि 100 विवाहित महिला आंध्र प्रदेश आणि तेलंगाणातील होत्या, असे पोलिसांनी सांगितले.वाचा सविस्तर

‘न्यूड’ लाईव्ह करणाऱ्या गहना वशिष्ठची खास मुलाखत, सांगितला 'पॉर्न' आणि 'इरॉटिका'मधील फरक

कॉम्प्युटर इंजिनियर असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने पॉर्न आणि इरॉटिकामधील फरक समजावून सांगण्यासाठी चक्क नग्न इन्स्टाग्राम लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. आपण कधीही पॉर्न फिल्म केलेली नाही आणि करणारही नाही, असे तिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. वाचा संपूर्ण मुलाखत

दोन नवऱ्यांची बायको, काकाला अंधारात ठेवून पुतण्याचं काकूसोबत लग्न, वाचा रंजक घटना

शिवहर - बिहारमधील शिवशर जिल्ह्यात सोमवारी रात्री एक अनोखं लग्न पार पडले. एका मुलाची आई असलेल्या काकूचं लग्न चक्क सख्य्या पुतण्यासोबत झाले. काका मजूरी करायला दुसऱ्या राज्यात गेले असता पुतण्या आणि काकूमध्ये प्रेमसबंध निर्माण झाले. त्यातून गावातील लोकांनी जबरदस्तीने हे लग्न लावून दिले. ही आश्चर्यकारक घटना तरियानी तालुक्यातील कुंडल गावात घडली.वाचा नात्यांचा अजब प्रकार

Video : पावसाचं रौद्ररूप; सिंध नदीच्या फेसाळत्या प्रवाहात चक्क पूल गेला वाहून

दतिया जिल्ह्यातील रतनगढमध्ये पावसाने कहर घातला आहे. सिंध नदीच्या जोरदार प्रवाहात संकुआनवरील पूल वाहून गेला. हा पूल सिंध नदीवर बांधण्यात आला होता. सिंध नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने ही घटना घडली. सिंध नदीचे हे भयंकर रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण आहे. सिंध नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा पूल कोसळल्यामुळे दातियाचा भिंड आणि ग्वाल्हेरशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पाहा थरारक व्हिडिओ

VIDEO : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्यजाणून घ्या दिवसाचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details