आज या घडामोडींवर असणार नजर -
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा
मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याला जाणार आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशीही ते पुण्यात चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी भेट झाली होती. या भेटीनंतर तातडीने राज ठाकरे पुण्याला रवाना झाले आहेत.
खूशखबर; आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस
मुंबई - रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई ते अहमदाबाद चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे. ट्रेन क्रमांक 82902 / 82901 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस चालणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. वाचा सविस्तर
कर्नाटकमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी, बोम्माई मंत्रिमंडळाचे आज खातेवाटप
बंगळुरू - कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर उपायोजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केरळ व महाराष्ट्राशी सीमा असलेल्या जिल्ह्यांमध्ये वीकेंड संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई मंत्रिमंडळाचे आज खातेवाटप होणार आहे.
पंतप्रधान मोदी आज गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून मोदी मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद साधतील.
ऑलिम्पिकमध्ये आज भारत पाक सामना, सुवर्णपदकाची आशा
हैदराबाद - टोकिओ ओलंपिकमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू जेवलिन थ्रो क्रीडाप्रकाराच्या अंतिम सामन्यात झुंजणार आहेत. या सामना रंजक होण्याची चिन्हे आहेत. बजरंग पुनिया आज कांस्यसाठी लढणार आहे. सेमीफायनलमध्ये बजरंगचा अजरबैजानच्या हाजी एलियेव याने पराभव केला होता. बजरंग पूनियाने कांस्य पदक जिंकल्यास भारताचे हे कुस्तीतील दुसरे पदक ठरेल. गोल्फर अदितिकडूनही भारताला पदकाची आशा आहे. अदितीकडे सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. जर खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर अदितीला रौप्य पदक मिळू शकते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मराठावाडा दौऱ्याचा तिसरा दिवस
मुंबई- राज्यपाल ५ ऑगस्टपासून तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
Political Analysis : दिल्लीतील वाढलेल्या राजकीय गाठीभेटींचा नेमका अर्थ काय?
मुंबई - राज्यात असलेल्या चार प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी दिल्लीत वाढत आहेत. या भेटींमधून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्ष एकमेकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे. वाचा सविस्तर विश्लेषण
BREAKING : सीएसएमटी, भायखळा, दादर, अमिताभ यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा फोन ! शोधमोहीम सुरू
मुंबई - मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत इतकंच सांगून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला आहे. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु आहे. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरु करण्यात आलीय. वाचा सविस्तर
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद यांचे नाव; मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' द्या
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. यात अशोक कुमार यांनी ध्यानचंद यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देण्याची मागणी केली. पाहा व्हिडिओ
'तू मर जा' असे प्रेयसीने म्हणताच, प्रियकराची फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या
ठाणे -एका २७ वर्षीय प्रियकराला त्याच्या प्रेयसीने ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून कल्याण पश्चिम परिसरातील राहत्या घरात जीवन यात्रा संपवली आहे. या तरुणाने आपण प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याचे फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अंकुश नामदेव पवार (वय, २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.वाचा काय आहे प्रकरण
कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर...
मुंबई - राज्यात काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून कोरोनाचे काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.वाचा सविस्तर
VIDEO : 7 ऑगस्ट - कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य
निसर्गाची उधळण असणाऱ्या 'या' गावांवर डोंगर कोसळण्याची भीती, अनेक ठिकाणी भूस्खलन, पाहा ईटीव्ही ग्राउंड रिपोर्ट
महापुराच्या संकटानंतर सांगली जिल्ह्यात आणखी एक संकट उभे ठाकले आहे, ते म्हणजे दरडी कोसळण्याचे. शिराळा तालुक्यातल्या डोंगरी भागात दरड कोसळून गावं, वाड्या-वस्त्या गाडल्या जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास 50 हून अधिक वाड्या-वस्त्या दरड कोसळण्याच्या भीतीच्या छायेखाली जगत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरज आहे, अन्यथा माळीण, तळीये, आंबेघर सारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती शिराळा तालुक्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भिती व्यक्त होत आहे, पाहुयात ईटीव्ही भारतचा हा ग्राउंड रिपोर्ट.. पाहा व्हिडिओ
बोलणे आवडले नाही म्हणून महिला शिक्षिकेची मुख्याध्यापकाला चप्पलेने मारहाण, पाहा व्हिडिओ
लखनौ - प्राथमिक शिक्षणमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या खुनियाव येथील व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाला चप्पलेने मारहाण केली आहे. याप्रकरणी प्रशासनाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. खुनियाव येथील धोबहा गावातील अगर्दीडोह गावात प्राथमिक विद्यालय आहे. या ठिकाणी शिक्षामित्र पुनम यांनी मुख्याध्यापक मनोज कुमार यांना मारहाण केली. मुख्याध्यापकाचे बोलणे आवडले नसल्याने ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ कोणीतरी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.VIDEO