आज या घडामोडींवर असणार नजर -
पंतप्रधान मोदी आज व्यापार व उद्योग क्षेत्रातील लोकांशी साधणार संवाद
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील भागधारकांसह परदेशातील भारतीय मिशन प्रमुखांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम 'लोकल गोज ग्लोबल - मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' साठी असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय महिला हॉकी संघाचा कांस्य पदकासाठी लढत
टोकियो - हॉकी सेमीफायनलमध्ये भारतीय महिला हॉकी टीमला अर्जेंटीनाकडून १-२ ने पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज भारतीय महिला टीमला देशासाठी पदक जिंकण्याची संधी आहे. कांस्य पदकासाठी आज भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनशी मुकाबला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मराठावाडा दौऱ्याचा दुसरा दिवस
मुंबई- राज्यपाल ५ ऑगस्टपासून तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मात्र, राज्यपाल राज्यात समांतर सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद
नागपूर - भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद बोलावली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत ते काच भूमिका मांडतात यांची उत्सुकता आहे.
वकील व पत्रकारांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा ?
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील लोकल प्रवासाबाबत महत्वाची घोषणा करू शकतात. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री वकील व पत्रकारांच्या लोकल प्रवासाबाबत महत्वाची निर्णय घेऊ शकतात.
शिवसेना नेत्या निलम गोऱहे जळगाव दौऱ्यावर
जळगाव- शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे याज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
एकमेकांची पाठ खाजवतात, तेच महाविकास आघाडीचे जास्त आवडते - अमृता फडणवीस
पुणे -राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार आल्यापासून या सरकारचे मला कोणते काम जास्त आवडले तर ते एकत्र येत एकमेकांची पाठ खाजवणे, अशी मिश्किल टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सरकारच्या कामगिरीवर टोला लगावला आहे. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) आदी उपस्थित होते. वाचा सविस्तर आणखी काय म्हणाल्या अमृता फडणवीस
तरुणीला कार्यालयातच काढालयला लावले कपडे.. उल्लू अॅपच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल
मुंबई - मुंबईतील एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लू डिजिटल प्रा.लि. कंपनीचे सीईओ विभू अग्रवाल आणि कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणीने या दोघांवर विनयभंगाचा आरोप केला आहे.वाचा काय आहे प्रकरण
लॉकडाऊनमुळे हालाखीत सापडलेल्या राज्यातील लोक कलावंतांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई -कोविडमुळे अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. यामध्ये राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांचाही समावेश आहे. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 56 हजार लोक कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी हे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले.वाचा काय आहे सरकारी मदत
Tokyo Olympics : रवी दहियानं जिंकलं रौप्य पदक, भारताला पाचवे पदक
टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाचा पराभव झाला. रशियाच्या झवुर युगुऐव याने रवी कुमार दहियाचा 7-4 ने पराभव केला. या पराभवासह रवी कुमार दहियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारताचे हे पाचवे पदक आहे. याआधी मीराबाई चानूने रौप्य तर पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं आहे.वाचा सविस्तर वृत्त
VIDEO : 6 ऑगस्ट राशीभविष्य - कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्यजाणून घ्या कसा असणार तुमचा दिवस
संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा - रवी राणा
अमरावती - मुसळधार पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झालं आहे. अमरावतीमध्ये देखील अनेकांची घरे पडली आहेत. अनेक शेतकरी वाहून गेलेत. पिकांचं देखील नुकसान झालं आहे, तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा केला नाही. अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झालेत, याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ दौरा करायला लावा, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केलं आहे.वाचा सविस्तर