आज या घडामोडींवर असणार नजर -
मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्सशी बैठक, कोरोना निर्बंध हटविण्याबाबत होणार चर्चा
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये आढावा घेऊन राज्याती मंदिरे, मॉल उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पी चिदंबरम यांच्याविरोधातील सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या विरोधातील सीबीआयच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात केली आहे.
आजपासून पुणे अनलॉक! पुण्यातील सर्व दुकाने, हॉटेल्सच्या वेळेत वाढ, मॉल्सही सुरू
पुणे - पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना सुट मिळाली आहे. महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आजपासून आधीच्या निर्बंधांपेक्षा बदल करण्यात आलेले आहेत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे . दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.
PM-Kisan Scheme: पंतप्रधान आज पीएम -किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित करणार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेचे लाभार्थी असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज (9 ऑगस्ट) रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हप्त्याचे वितरण करणार आहेत. या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार आहे. तर याचा लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून देशाला संबोधित करतील. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राज्य सरकारविरोधात रंगकर्मीचे आज आंदोलन
मुंबई - कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेत दिवस कंठणारे रंगकर्मी आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी राज्यभर एकाच वेळी आंदोलन करणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यस्तरीय बैठक, संभाजीराजे छत्रपती राहणार उपस्थित
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहे. बैठकीनंतर संभाजीराजेंची पत्रकार परिषद होणार आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, 15 ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल सुरू
मुंबई - मुंबईकराकंसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल रेल्वे सेवा सुरू होणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू होणार आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मुभा दिली जाणार आहे. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या अन्य घोषणा
Pune Unlock : पुणेकरांसाठी खुशखबर! विकेंड लॉकडाऊनही नाही
पुणे - मुंबईनंतर आता पुण्यातीलही निर्बंध शिथिल होणार आहेत. उद्यापासून सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तसेच हॉटेलही आठवडाभर रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले शहरातील मॉल देखील रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र, ज्या लोकांचे दोन डोस झाले आहेत, अशांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा पॉझिटिव्ही रेट 5 टक्क्यांच्या पुढे असल्याने ग्रामीण भागातील दुकानेही दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊनही लागू असणार नाही. त्यामुळे आठवडाभर हे नवीन नियम लागू असणार आहेत...तर पुन्हा लॉकडाऊन लावणार, अजित पवारांचा पुणेकरांना इशारा
कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र डोस प्रभावी; ICMR च्या अभ्यासाचा निष्कर्ष
नवी दिल्ली :कोवॅक्सीन (Covaxin) और कोविशील्ड (Covishield) लसीचा मिश्रित डोस प्रभावी असल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) यांनी हा अभ्यास केला. आईसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 18 लोकांवर दोन्ही लसींची मात्र दिली. त्याचा चांगला प्रभावी जाणवल्याचे त्यात नमूद करण्यात आले.वाचा सविस्तर
VIDEO : रुग्णालयात अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदारास महिलांनी अन् मनसे कार्यकर्त्यांनी भररस्त्यात चोपले
अमरावती शहरात नवीन तयार झालेल्या रिम्स हॉस्पिटलमधील सुरक्षा कंत्राटदाराच्या अनेक तक्रारी तेथील महिला कामगाराकडून गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला येत होत्या. पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते. पाहा व्हिडिओ
9 ऑगस्ट राशीभविष्य : श्रावणाचा पहिला सोमवार कोणत्या राशीसाठी ठरणार लाभदायी
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्यजाणून घ्या आजचे राशीभविष्य
सुवर्ण पदकानंतर नीरज चोप्राचे पुढील लक्ष्य काय? जाणून घ्या काय म्हणाला गोल्डन बॉय
टोकियो -भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. तो अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. या कामगिरीनंतर नीरज चोप्रा याने आपलं पुढील लक्ष्य सांगितलं आहे. वाचा सविस्तर
'राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले', नीरज चोप्रावरील एका ट्विटने पेटला नवा वाद
मंबई - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या या कामगिरीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे एका ट्विटवरुन सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. वाचा काय आहे प्रकरण व कोणी केले वादग्रस्त ट्विट