महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम संपणार की वाढणार आज ठरणार.. समीर वानखेडेंची चौकशी, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज - Bombay HC to hear bail plea in drugs case today

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल

top news
top news

By

Published : Oct 26, 2021, 6:12 AM IST

Updated : Oct 26, 2021, 6:17 AM IST

आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -

आर्यन खान तुरुंगातून बाहेर येणार का? आज ठरणार -

मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक होऊन तीन आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. त्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय व एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचले असून त्यावर आज (मंगळवार) सुनावणी होणार आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढणार की आर्यन बाहेर येणार हे आज ठरणार आहे.

अनन्याची एनसीबी कार्यालयात आज पुन्हा चौकशी -

मुंबई -आर्यन खान बरोबर ड्रग्ज केसमध्ये अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेचीही एनसीबीने दोन वेळा चौकशी केली आहे. एनसीबीने अनन्याची जवळपास सव्वा सहा तास चौकशी केली आहे. अनन्याने एनसीबीने लावलेले सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. या प्रकरणी एनसीबीने अनन्याला सोमवारी तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तिने वैयक्तिक कारण सांगत चौकशीला गैरहजर राहिली होती. आज अनन्या एनसीबी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडेच्या चौकशीसाठी दिल्लीची टीम येणार मुंबईत -

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा देखील त्यांच्यावर आरोप झाला आहे. यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आज एनसीबीचे दिल्लीतील एक पथक मुंबईला येणार आहे. या पथकात NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह अन्य दोन इन्स्पेक्टर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

समीर वानखेडे व ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांची पत्रकार परिषद -

मुंबई -एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रूझवरील ड्रग्स कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला आहे. आता पेहचान कौन आणि फर्जिवाडा इथूनच सुरु होतो, असे ट्वीट करत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्यन खान प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी व समीर वानखेडे चौकशीच्या पार्श्वभूमीवर आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार आहे.

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तान-न्यूझीलंड व आफ्रिका-विंडीज सामना

शारजा - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला धूळ चारल्यानंतर पाकिस्तानची ट्वेन्टी-२० विश्वचषकात मंगळवारी ‘अव्वल-१२’ फेरीमध्ये न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेण्याच्या न्यूझीलंडच्या निर्णयाची परतफेड करण्यास बाबर आझमचा संघ उत्सुक आहे. गट अ मध्ये दक्षिण आफ्रकेची गाठ वेस्ट इंडीजशी पडणार आहे.

काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -

Aryan khan Drugs Case : साक्षीदार किरण गोसावी लखनौ पोलिसांना येणार शरण, ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार आहे. लखनौमधील मडियाव पोलीस ठाण्यात शरण येणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मडियाव पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

वाचा सविस्तर -Aryan khan Drugs Case : साक्षीदार किरण गोसावी लखनौ पोलिसांना येणार शरण, ऑडिओ क्लिप व्हायरल

महाराष्ट्रात AY4 व्हेरीयंटचा धोका नाही- राजेश टोपे

जालना - महाराष्ट्रात कोरोनाच्या AY4 व्हेरीयंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत जलद गतीने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

वाचा सविस्तर -महाराष्ट्रात AY4 व्हेरीयंटचा धोका नाही- राजेश टोपे

नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नाशिक -लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 'कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. 3,4 व 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते.

वाचा सविस्तर -नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

फोन टॅपिंग प्रकरणात रेशमी शुक्ला त्यांच्या विरोधात सबळ पुरावे, राज्य सरकारचे हायकोर्टात माहिती

मुंबई - फोन टॅपिंग आणि काही गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातून त्यांना वगळून त्यांना सरसकट दिलासा देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात मांडली. फोन टॅपिंग प्रकऱणातील गोपनीय अहवाल बाहेर आलाच कसा?, याचा तपास होणे आवश्यक असल्याचेही राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

वाचा सविस्तर -फोन टॅपिंग प्रकरणात रेशमी शुक्ला त्यांच्या विरोधात सबळ पुरावे, राज्य सरकारचे हायकोर्टात माहिती

देशाला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करतंय - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर -देशाला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. या सगळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाचा सविस्तर -देशाला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करतंय - चंद्रकांत पाटील

SPECIAL :

"तीन वर्षांत देशातील सर्व रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे" ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरींचा विश्वास

नागपूर : येत्या तीन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे सर्वोच्च दर्जाचे असतील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान बोलून दाखविला. देशात वेगवेगळ्या 26 महामार्गांचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पाहा संपूर्ण मुलाखत -"तीन वर्षांत देशातील सर्व रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे" ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरींचा विश्वास

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

26 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास अनुकूल आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

26 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास अनुकूल आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Last Updated : Oct 26, 2021, 6:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details