महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय आज देणार निकाल..पंतप्रधान मोदींचे पूर्व-आशिया शिखर संमेलनात भाषण, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

MARATHI TOP NEWS
MARATHI TOP NEWS

By

Published : Oct 27, 2021, 5:59 AM IST

आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -

क्रुझ ड्रग्ज पाट्री प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा आज निकाल

आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी हायकोर्टात भारताचे माजी ऍटर्नी जनरल आणि जेष्ठ कायदेतज्ञ मुकूल रोहतगी कोर्टात पोहचले आणि रोहतगी आर्यनच्या जामिनासाठी जोरदार युक्तिवाद केला. नंतर अरबाज मर्चंटची बाजू मांडण्यासाठी वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी कोर्टाने तुम्हाला किती वेळ लागेल, अशी विचारणा केली. त्यावर अमित देसाई यांनी ४५ मिनिटं लागतील तर एनसीबीच्या वतीने एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी देखील ४५ मिनिटं लागतील असं सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी आजपर्यंत तहकूब केली. आज दुपारी यावर सुनावणी घेण्यात येईल.

पंतप्रधान मोदी आज 16 व्या पूर्व-आशिया शिखर संमेलनात सहभागी होणार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 व्या पूर्व-आशिया शिखर संमेलनात (16th East Asia Summit) व्हर्युअल पद्धतीने सामील होणार आहेत. या संमेलनात समुद्री सुरक्षा व दहशतवादासह प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्यावर व समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्याच बरोबर मोदी गुरुवारी ब्रुनेईचे सुल्तान हसनल बोलकिया यांच्या आमंत्रणावरून 18 व्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आसियान-भारत संमेलनातही भाग घेणार आहेत. या संघटनेत 10 आशियान देशांच्या सदस्यांशिवाय भारत, चीन, जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया सामील आहेत.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये बोनस, आज घोषणेची शक्यता

कोरोना विषाणूशी लढा सुरू असताना मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये इतका बोनस देण्यात आला होता. यावर्षी परिस्थिती सुधारली असल्याने बोनसची रक्कम वाढवण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मागील वर्षापेक्षा 500 रुपयांची वाढ करून 16 हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे. याची घोषणा मुंबईच्या महापौर आज बुधवारी करणार असल्याचे समजते.

मुंबई महापालिका स्थायी समितीची सभा दीड वर्षानंतर आज होणार -

कोरोना काळापासून बंद असलेली मुंबई महापालिका स्थायी समितीची सभा आज तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे. दीड वर्ष ही सभा ऑनलाईन घेण्यात येत होती.

एसटीप्रवास दरवाढ : आज एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने मागणी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य न झाल्यामुळे आजपासून राज्यभर एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागणार आहे.

रमाई घरकूल योजनेतील 3 हजार घरे प्रलंबित.. भाजपचे आज राज्य सरकारविरोधात आंदोलन

रमाई घरकूल योजनेतील तीन हजार प्रकरणे प्रलंबित असल्याने नागपूरमध्ये भाजपकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल मिळावे, या उद्देशाने आवास योजना राबविली जाते. मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जातो.

काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -

Drug Case : आर्यन खानच्या जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी; वाचा, आज न्यायालयात काय घडलं?

मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या 20 दिवसांपासून कोठडीत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला असून, सुनावणी उद्यावर(27 ऑक्टोबर) ढकलली आहे.

वाचा सविस्तर -Drug Case : आर्यन खानच्या जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी; वाचा, आज न्यायालयात काय घडलं?

विधान परिषदेच्या 8 जागांसाठी डिसेंबर अखेर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई - विधान परिषदेमधील आठ आमदारांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 मध्ये संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये आठ नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे रामदास कदम आणि गोपीकिशन बजोरिया, काँग्रेसचे भाई जगताप आणि सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप, भाजपचे अमरिश पटेल आणि गिरीष व्यास तर, अपक्ष प्रशांत परिचारक यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या आठ जागांवर संधी मिळावी यासाठी चारही पक्षाकडून लॉबिंग सुरू झाली आहे.

वाचा सविस्तर - विधान परिषदेच्या 8 जागांसाठी डिसेंबर अखेर निवडणूक होण्याची शक्यता!

restaurant on wheels : रेल्वेच्या उपक्रमास मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

मुंबई -मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या रेस्टॉरंट ऑन व्हिल्सला पर्यटक आणि मुंबईकरांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात रेस्टॉरंट ऑन व्हिल्सला अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसूनच खाद्य पदार्थांची चव चाखली आहे. विशेष म्हणजे रेल्वेचा या रेस्टॉरंट ऑन व्हिल्सला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद बघता इतर रेल्वे स्थानकांतही रेस्टॉरंट ऑन व्हिल्स संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर - restaurant on wheels : रेल्वेच्या उपक्रमास मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

ईटीव्ही भारत विशेष - भाडेवाढीनंतरही दररोज एसटीला १४ कोटींचा तोटा!

मुंबई -गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागल्याने एसटीचा संचित तोटा दहा हजार कोटींचा घरात पोहोचला आहे. सध्या एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच सततचा इंधन दरवाढीमुळे मोठी झळ महामंडळाला बसू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १४ कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने १७.१७ टक्के भाडेवाढ केली आहे. मात्र, या भाडे वाढीमुळे सुद्धा एसटीचा तोटा भरून निघणे शक्य नाही आहे.

वाचा सविस्तर -ईटीव्ही भारत विशेष - भाडेवाढीनंतरही दररोज एसटीला १४ कोटींचा तोटा!

ईटीव्ही विशेष : नवाब मलिक बनले महाविकास आघाडीचे 'हिरो'!

मुंबई -वानखेडे प्रकरणावरून सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी संपूर्ण प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे ओढून घेतला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम कदम, नारायण राणे, त्यांचे दोन्ही सुपुत्र, चित्रा वाघ महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोपांची राळ उठवत होते. परंतु, आघाडीचे नेते जोरदार प्रत्युत्तर देत नव्हते. आता समीर वानखेडे प्रकरणावरून नवाब मलिक देत असलेले प्रत्युत्तर पाहता महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांत आपणही तोडीस-तोड उत्तर देऊ शकतो असे बळ निर्माण होऊ लागले आहे. नवाब मलिक हे म्हणूनच महाविकास आघाडीचे 'हिरो' ठरले आहेत.

वाचा सविस्तर -ईटीव्ही विशेष : नवाब मलिक बनले महाविकास आघाडीचे 'हिरो'!

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस -

27 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

जाणून घ्या आजचे - भविष्य 27 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details