महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - काँग्रेस नेते राहुल गांधी

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Dec 8, 2021, 7:00 AM IST

  • आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
  1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबई येथील नौदलास भेट देतील, त्यानंतर सायंकाळी 4 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट होणार आहे.
  2. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करणार आहेत.
  3. भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग हे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयातून दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
  4. बॉलिवूडचा 'ही मॅन', अशी ओळख असणाऱ्या धरम सिंह देओल उर्फ धर्मेंद यांचा आज वाढदिवस आहे.
  5. मुंबईतील अण्णासाहेब पाटील महामंडळावर आज सकल मराठा समाज धडकणार आहे.
  • कालच्या महत्वाच्या बातम्या -
  1. दिल्ली -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना युपीएमध्ये प्रवेश करेल का? असा प्रश्न आता पुढे आला आहे. त्यावर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. त्यावर, शिवसेनेच्या युपीएत प्रवेशाबाबत येणारा काळ सांगेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. वाचा सविस्तर...
  2. नवी दिल्ली -आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. ही बैठक संपली असून राऊत यांनी भाजपविरोधी युतीबाबत भाष्य केले आहे. काँग्रेसशिवाय असणारी कुठलीही युती ही भाजपशी दोन हात करण्यात समर्थ असू शकत नाही, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर...
  3. मुंबई -राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ( Corona Patient ) आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराहुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (मंगळवारी) 699 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू ( 19 Patients Death )झाला आहे. तर 1087 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( Discharge to 1087 Patients ) आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा...
  4. मुंबई-महाराष्ट्र विकास आघाडीचे अनेक मंत्र्यांवर ईडी चौकशीचा ( ED probe in Maharashtra ) ससेमिरा सुरू आहे. त्यात आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ( Maharashtra Cooperative Bank scam ) आज मंगळवार (7 डिसेंबर) रोजी चौकशी सुरू आहे. प्राजक्त तनपुरे यांनी लिलावात घेतलेला अहमदनगर येथील साखर कारखान्यात गैरव्यवहार झाला असल्याच्या संशयावरून ईडीकडून चौकशी सुरू आहे. सविस्तर वाचा...
  5. जालना - ओमायक्रॉनची राज्यातील रुग्णसंख्या 10 झाली असून राज्यात आता काँटॅक्ट, ट्रेसिंग वाढवावी ( Rajesh Tope On Omicron Proliferation ) लागेल. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांच्या RTPCR चाचणी घेण्याचे काम सुरू असून लसीकरण वाढवण्याची गरज ( Rajesh Tope on Vaccination in Jalna ) आहे. सध्या निर्बंध लावण्याची गरज नसून परिस्थिती पाहून त्यावर निर्णय होईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितले आहे. सविस्तर वाचा ...
  6. मुंबई -मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल (Wankhede Defamation case) केली होती. यावर आज मंगळवार (दि.07) रोजी सुनवणी झाली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिक यांना फटकारले असून 10 डिसेंबरपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर (Mumbai HC on Nawab Malik ) करण्याचे सांगितले आहे. न्यायालयाने मनाई केली असतानाही मंत्री मलिक यांनी पुन्हा एकदा वानखडे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले असल्याची चर्चा सुरु आहे. सविस्तर वाचा ...
  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
  1. VIDEO : 08 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  2. 8 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details