महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गोरखपूरच्या दौऱ्यावर आहेत... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - 7 December news

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Dec 7, 2021, 6:32 AM IST

  • आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 7 डिसेंबरला गोरखपूरचा दौरा करणार आहेत. ते 9 हजार 600 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. गोरखपूर खत प्लांटचेही लोकार्पण करणार आहे.
  2. मुंबईत पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी हवामान खात्याने राज्यातील विविध शहरांमध्ये येलो अलर्ट जाहीर केले होते. त्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये काडाक्याच्या थंडीसह मुसळधार पाऊस झाला होता.
  3. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
  4. ग्रामीण भागातील नागरिकांची सरकारी कार्यालयातील कामे वारंवार चकरा मारून ही होत नाही. तेच काम एका तासात करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील 15 वर्षांपासून बच्चू कडू यांनी आपल्या मतदार संघात कर्तव्य यात्रा हे उपक्रम राबवत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही यात्रा आज मेळघाटात पोहोचणार आहे. मेळघाटात पहिल्यांदाच या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ येथील नागरिकांना होणार आहे.
  5. आज आंतरराष्ट्रीय हवाई नागरी दिवस आहे. 7 डिसेंबर, 1944 रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
  6. अभिनेत्री कॅटरिना कैफ व विकी कौशल हे दोघे 9 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या संगीतचा कार्यक्रम 7 डिसेंबरला म्हणजेच आज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • कालच्या महत्वाच्या बातम्या -
  1. मुंबई - जगभरात कोरोनानंतर आता ओमायक्रॉन विष्णूचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात डोंबिवलीत १ (Kalyan - Dombivali) , पिंपरी चिंचवडमध्ये ६ (Pimpari Chinchwad) तर पुणे (Pune) येथे १ ओमायक्रॉनचा रुग्ण असे एकूण ८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज मुंबईमधील २ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० (10 Omicron patients in Maharashtra) झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सविस्तर वाचा..
  2. मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा अत्यंत गाजत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27 टक्के आरक्षण ओबीसींना देण्याबाबतचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली (SC Stays 27% OBC Reservation) आहे. सविस्तर वाचा...
  3. मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Workers Strike) सर्वसामान्य जनतेबरोबरच कॉलेज व शाळकरी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Adv. Anil Parab) यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू (ST Employees Back To Work) झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक (ST Bus Start Again) सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १ हजार ७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रूपयांची भर पडली आहे. सविस्तर वाचा...
  4. मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. सोमवारी 518 नव्या ( New 518 cases in 6th Dec 2021 ) रुग्णांची नोंद झाली आहे. असे असले तरी ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे 10 रुग्ण ( Omicron corona cases in Maharashtra ) आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा...
  5. मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation in Local body Elections) मिळावे यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. आज या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली (SC Stays 27% OBC Reservation) आहे. तसेच ओबीसी समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारकडून या निर्णयाचा अभ्यास केला जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik on OBC Reservation) यांनी दिली आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको ही आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही मलिक म्हणाले. सविस्तर वाचा...
  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details