आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- आज वर्षातील शेवटचे आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण
2021 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज आहे. 580 वर्षांनंतर केवळ काही सेकंदांसाठी दिसणार सर्वात मोठे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे.
- आजपासून पुढील तीन दिवस देशातील बँका बंद
सलग सुट्ट्यांमुळे देशातील बँका आजपासून तीन दिवस बंद असणार आहे. आज गुरुनानक जयंती व पुढील दोन दिवस शनिवार व रविवार येत असल्याने बँकांना सुट्टी आहे.
- अमरावतीमधील इंटरनेट सेवा आजपासून पूर्ववत
अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
- आज शीख गुरु गुरुनानक जयंती
शीख धर्मासाठी गुरु नानक जयंती हा मोठा सण आहे. दरवर्षी गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2021) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
- आज भारत न्यूझीलंड दुसरा T -20 सामना आज
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आज रांचीमध्ये दुसरा सामना खेळला जाणार आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि अंतरिम जामीनावर असलेल्या (८२) वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव (Senior Telugu poet Varvara Rao) यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा (Senior Telugu poet Varvara Rao) दिला आहे. वरवरा राव यांना २ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याची गरज नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खंडपीठाने वरवरा राव यांना 29 नोव्हेंबर रोजी नानावटी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.सविस्तर वाचा...
मुंबई -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजपकडून संजय कणेकर व काँग्रेसकडून प्रज्ञा सातव (pradnya satav) यांना उमेदवारी दिली गेली आहे. परंतु, ही निवडणूक शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होत असल्याने ती बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.सविस्तर वाचा...
गडचिरोली -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप(ST Workers Strike) मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा, अशी सूचना करत विलिनीकरणाची मागणी अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत पवारांनी दिले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी आडमुठेपणाचा मार्ग सोडावा. मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते जमावाशी नाही, असेही शरद पवार म्हणाले. सध्या शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते गडचिरोली येथे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने संवादातून मार्ग काढावा. तसेच प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.सविस्तर वाचा...
चंद्रपूर -त्रिपुरा सारख्या राज्यात संघर्षाची स्थिती निर्माण होते आणि नांदेड, अमरावती,(Amravati Violence) मालेगाव सारख्या ठिकाणी दंगली होतात. या दंगली होण्याचे नेमके कारण काय? पोलीस त्याची चौकशी करतील आणि वस्तुस्थिती लवकरच बाहेर येईल. मात्र, पहिल्या दिवशी दंगल झाल्यानंतर ज्यांचा हातात देशाची सत्ता आहे. त्यांच्या विचारसरणीच्या लोकांनी वेगळ्या पद्धतीची दंगल केली. जे देश चालवत आहेत म्हणतात, ज्यांच्या हातात पाच वर्षे या राज्याची सूत्रे होती, ते सत्ता गेल्यानंतर असे भ्रमिष्टासारखा वागतो. चुकीचे धोरण अवलंबतो याचे उदाहरण अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेत दिसून आले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. ते मूल येथे जाहीर सभेत बोलत होते.सविस्तर वाचा...
मुंबई -त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचे (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात नांदेड, मालेगाव, अमरावतीमध्ये (Amravati violence) उमटले. त्रिपुरामध्ये जी घटना झालीच नाही, त्या घटनेचे पडसाद येथे उमटले आणि जातीय दंगली भडकल्या गेल्या. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांकडून व्हायला पाहिजे, ही मागणी करत येत्या सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी दिला आहे.सविस्तर वाचा...
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये कोरोना लसीकरणाचे (madhya pradesh vaccination drive) प्रमाण वाढविण्यासाठी खंडवा जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या व्यक्तींनी लशींचे दोन डोस (coronas two doses) घेतले आहेत, त्यांनाच दारू विक्री करावी, असे आदेश उत्पादन शुल्काने विभागाने दारू विक्रेत्यांना दिले आहेत.सविस्तर वाचा...
पणजी- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (52nd International Film Festival) 52 वी आवृत्ती, IFFI 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात आयोजित केली जात आहे. सध्याची कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता, 52 वा IFFI संकरित स्वरूपात आयोजित (Organized in IFFI hybrid form) करण्यात आल्याची माहित गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -