महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजपासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

टॉप न्यूज
टॉप न्यूज

By

Published : Nov 18, 2021, 5:56 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आजपासून दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam 2022) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होणार आहे. माध्यमिक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे आहेत.

  • आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सिडनी संवाद' संबोधित करणार

आज सकाळी 9 वाजता सिडनी संवादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तंत्रज्ञानाच्या नविन मार्गांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित करणार आहे.

  • आज सर्वात मोठं खंडग्रास चंद्रग्रहण

या शतकातलं सर्वांत मोठं म्हणजे सुमारे साडेतीन तास चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (lunar eclipse) हे आज आहे. 580 वर्षांनंतर असं दीर्घ चंद्रग्रहण दिसणार आहे.

  • राज्यातील १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट

अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Area) निर्माण झाला आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Rain in maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert in 13 districts) जारी केला आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

नागपूर -100 कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (anil deshmukh ed custody) अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत केंद्र सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. (sharad pawar on vidharbh visit) आज ते नागपूर येथे बोलत होते. (sharad pawar in nagpur) आज पहिल्यांदा असे झाले ती मी आलो आणि अनिल देशमुख इथे नाही आहेत, अशी आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. आपण अनेक वर्षांपासून सोबत काम करत आहोत. अत्यंत समर्थपणे कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.सविस्तर वाचा...

मुंबई -मुस्लिम बहुल विभागामध्ये लसीकरणाची मोहीम (Vaccination campaign) वाढवण्यासाठी अभिनेता सलमान खान (Salman Khan) व धर्मगुरूंची मदत घेणार असल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर आता सरकारच्या या निर्णयावर भाजपा नेते आमदार राम कदम (Criticism of BJP MLA Ram Kadam) यांनी ट्विट करून ताशेरे ओढले आहेत. सलमान खानला महाराष्ट्र सरकार लसीकरणाला गती यावी म्हणून घेणार आहे? की कोणत्या विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी? आम्हाला सलमान खान संदर्भात कोणताही प्रश्न नाही. मात्र भूतकाळ आठवता महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसच्या हेतूबाबत शंका जरूर आहे, असे राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे.सविस्तर वाचा...

कोल्हापूर - पन्हाळागडावर पुन्हा एकदा बिबट्याने एका श्वानावर हल्ला (Attempt by leopard to attack dog) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अशा पद्धतीने बिबट्याने श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेचच घडलेली ही घटना आता सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली आहे.सविस्तर वाचा...

मुंबई -भारतात कोरोना लसीकरण (Corona vaccination) झपाट्याने होत आहे. तर कोरोना लसी घेण्यावरुन अजूनही बऱ्याच नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (CEO Adar Poonawala appeals) यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना साथीच्या रोगावर मात करण्यासाठी लसीचा संकोच हा आता सर्वात मोठा धोका आहे, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा...

मुंबई -अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) आपल्या फाजील बडबडीने सध्या प्रकाश झोतात आली आहे. कंगना रणौत जाणून-बुजून अशा पद्धतीची वक्तव्य करून प्रसारमाध्यमांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi)यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अपमान कंगना रणौत करत आहे, असे सांगत, कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole)यांनी केली आहे.सविस्तर वाचा...

मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने (Mumbai's Esplanade court) परवानगी दिली आहे. आता, पोलीस त्यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करू शकतात आणि त्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. जर ते ३० दिवसांच्या आत समोर आले नाहीत, तर मुंबई पोलीस (Mumbai Police) त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, असे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी सांगितले.सविस्तर वाचा...

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 (Maharashtra State Board for Secondary and Higher Secondary Education) मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे फॉर्म गुरुवारपासून स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा फॉर्म भरावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी आज केले.सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details