आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- आज माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्त देशभरात शिक्षकदिन साजरा करण्यात येत आहे.
- नागपूरमध्ये आज अनुकंपा पीडित व शिक्षकांचा निषेध मोर्चा
- कोविड राज्य कृती दलाद्वारे आयोजित 'माझा डॉक्टर' या ई-वैद्यकीय परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करतील.
- आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता
- महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा आजचा शेवटा दिवस
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- पुणे -केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही केला जात आहे. या माध्यमातून विरोधकांना नमुन्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या हस्ते आज (शनिवारी) पुण्यातील एका शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा....
- श्रीरामपुर (अहमदनगर) - शहरातील एमआयडीसी परीसरात एका प्लाटमध्ये राहत असलेल्या मेंढपाळ श्रावण अहिरे याने आपल्या मालकाकडून उसणे घेतलेले अडीच लाख रुपये बुडवता यावे म्हणून त्याने स्वतःच्याच दहा महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची पहाटे झोपेत गळा दाबून हत्या केल्याच उघड झाल आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खूनी पित्यास अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज (शनिवारी) ४ सप्टेंबरला ४१३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल (शुक्रवारी) राज्यात ९२ मृत्यूची नोंद झाली होती. आज त्यात किंचित घट होऊन ६४ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज २,५०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सविस्तर वाचा...
- औरंगाबाद - राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा मी करेक्ट कार्यक्रम करेन, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी शेट्टी यांनी ते वाक्य राष्ट्रवादी साठीच वापरलं हे कशावरून, अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. सविस्तर वाचा....
- अमरावती - मेळघाटमधील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनखात्याने गठीत केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी अहवाल वन विभागाला सादर केला होता. यात समितीचे अध्यक्ष एम.के.राव यांनी निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना क्लीनचिट दिली. त्यामुळे या चौकशी समितीवरच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या खासदार नवनीत राना यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशिभविष्य -