महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज पुण्यात मनसेतर्फे घंटानाद आंदोलन, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर....

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
top news

By

Published : Sep 2, 2021, 6:04 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे राज्य सरकारने मंदिरे खुली करावी यासाठी मनसेतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे
  • मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असणार उपस्थित
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पंचगंगा परिक्रमा यात्रेचा दुसरा दिवस
  • आज महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची नाशिक येथे पत्रकार परिषद
  • आज भाजपातर्फे मुबंईतील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद
  • गणेशोत्सवासंदर्भात दगडूशेठ गणेशमंदिर प्रशासनाची पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता होईल
  • राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  • मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थित होते. या भेटीवेळी राज्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यात असलेली कोरोना परिस्थिती, राज्यात आलेली पूर परिस्थिती आणि राज्यात धरणात असलेला पाणीसाठा या सर्व संदर्भात राज्यपालांनी माहिती घेतली. तसेच बारा राज्यपाल नामनिर्देशित सदस्य या मुद्द्यांवर राज्यपालांनी चर्चा झाली. मंत्रिमंडळाने सूचित केलेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, याबाबत आज पुन्हा एकदा राज्यपालांना विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सविस्तर वाचा...
  • मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंद केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज बुधवारी १ सप्टेंबर रोजी ४४५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज मृत्यूसंख्या वाढली असून, १८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ४,४३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - या देशात कायद्याचे राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना काही लोकांनी आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा....
  • नवी दिल्ली -इंधनाच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या मते जीडीपी (GDP) म्हणजे गॅस (G), डिझेल (D) आणि पेट्रोलच्या (P) किमतीत वाढ, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details