आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ८० वा भाग आहे.
- राज्यात आजपासून चार ते पाच दिवस मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज
- कृषी कायद्या विरोधात आज नाशिकमध्ये शेतकरी व कॉंग्रेसचे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
- नागपूर महानगरपालिका आणि शासकीय कोणत्याही केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही.
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आज नवी मुंबईतील बेलापूर येथे केंद्रीय सदनमध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
करनाल (हरयाणा) -शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.सविस्तर वाचा...
सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.सविस्तर वाचा...
मुंबई -बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.सविस्तर वाचा...
सिल्लोड (औरंगाबाद) - तालुक्यातील उपली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघ दावाडी येथे मंगळवारी वळण रस्त्यावर तुषार महेर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह घरी नेण्यासाठी चक्क खाटेचा वापर करावा लागलेला आहे.सविस्तर वाचा...
नाशिक -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक स्वास्थ्य सध्या ठीक नाही. त्यांना मानसिक आधार मिळावा म्हणून सर्व शिवसैनिक प्रार्थना करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रार्थना करावी, असेही राऊत म्हणाले आहेत. आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निमित्ताने संजय राऊत नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.सविस्तर वाचा...