आज दिवसभरात/आजपासून -
- आज सकाळी 11 वाजता गुजरातमधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे जिल्हा दौरा करणार आहेत.
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे येथे आज बैलगाडी, छकडा शर्यत भरवली आहे. मात्र, याला प्रशासनाने विरोध केला आहे. कारण, बैलगाडी शर्यतीला परवानगी नाही. मात्र, बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी पडळकरांनी बैलगाडी शर्यत भरवली आहे. त्यामुळे आज नक्की काय होणार? याकडे लक्ष असणार आहे.
- केंद्रीय मंत्री नाराय राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली आहे. ही यात्रा आज समता नगर पोलीस स्थानक येथून जाणार आहे.
- नागपूर व अमरावती मिशन लसीकरण अंतर्गत 200 वाहनांचे आज हस्तांतरण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार याचे उद्घाटन होणार आहे.
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर्व विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार देखील उपस्थित असणार आहेत.
- आज नांदेड येथे मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन होणार आहे. याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केली आहे.
- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एक दिवसीय नाशिक दौरा होणार आहे.
- मुंबईत आज लसीकरण बंद, उद्या सुरू राहणार आहे.
- आजही बँका बंदच राहणार आहेत.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
पालघर -वाडा तालुक्यातील मेट येथील पेल टेक हेल्थ केअर या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.वाचा सविस्तर...
श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये गुरूवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार केले जात असून घटनास्थळी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. वाचा सविस्तर...
जालना - जालन्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली. ही यात्रा जालन्यात दाखल होताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच कराड यांना गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवले. तसेच भागवत कराड यांना गद्दार म्हणूनही संबोधण्यात आले. वाचा सविस्तर...
लखनौ/काबुल - उत्तर प्रदेशमध्ये तालिबानींचे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. समाजवादी पक्षाचे खासदार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री मौसाना मसूद मदनी यांच्यानंतर प्रसिद्ध शायर मुनव्वर राना यांनी तालिबानींना समर्थन (Munawwar Rana Support Taliban) दिले आहे. तालिबानी लोक वाईट नाहीत. परिस्थितीमुळे ते तसे झाल्याचे राना यांनी अजब वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर...