- आज दिवसभरात -
- देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे.
- आजपासून युकेतून येणारी विमानसेवा स्थगित. पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.
- भारत वि. दक्षिण आफ्रिका आज दुसरा कसोटी सामना. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील The Wanderers Stadium येथे हा सामना खेळला जाईल.
- प्रो कबड्डी लीग - आजचे सामना बंगाल वॉरियर्स वि. जयपुर पिंक पैंथर्स सायंकाळी 7:30 वाजता सामना सुरू होणार
- प्रो कबड्डी लीग - आजचा सामना तेलुगु टाइटन्स वि. पटना पाइरेट्स रात्री 8:30 वाजता सामना सुरू होणार
- काल दिवसभरात -
- मुंबई -काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या ( Corona Patient Increasing ) झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 877 नवीन ( Todays Corona Patient Number In Maharashtra ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या ५० नव्या ( New omicron Patient ) रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा -
- नवी दिल्ली -देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय पुढील दोन आठवडे व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी घेणार आहे. 3 जानेवारीपासून व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणीस सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने रविवारी संध्याकाळी एक परिपत्रक जारी करून हा निर्णय जाहीर केला. सविस्तर वाचा -
- पुणे - नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ ( Pune Corona Patient Numbers Increased ) घालायला सुरवात केली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा ( Omicron In Maharashtra ) उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण ( Pune Todays Corona Patient numbers ) आढळले असून यात ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Pune Omicron Patient Numbers ) लागण झालेले 36 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.सविस्तर वाचा -
- पुणे - वडगाव पुलावर एका भीषण दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. ( Bike Truck Accident Pune ) मुबंई-बंगळूर महामार्गावर पुण्यातील वारजे नदीवरील पुलावरून पुढे आल्यावर सनसिटीकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ( One died in Bike Truck Accident on Vadgaon Bridge Pune ) ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर वाचा -
- मुंबई : 'बुली बाई' अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो ( Muslim Women Offensive Content ) अपलोड करुन त्यात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली ( Priyanka Chaturvedi FIR Against Bulli Bai App ) आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सायबर सेलकडे ( Mumbai Cyber Cell ) देखील त्यांनी तक्रार केली आहे. सविस्तर वाचा -
वाचा आजचे राशीभविष्य -