महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Oral Health Day : तोंडाची स्वच्छता कशी ठेवणार? वाचा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - ETV Bharat special report on World Oral Day

युवकांमध्ये गुटखा, तंबाखू, पानसुपारी यासारख्या व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. ज्यास्तवेळ पान सुपारी तोंडात राहिल्याने तरुणांमध्ये मौखिक रोग वाढत आहेत. (World Oral Health Day 2022) त्यासोबतच लहान मुलांमध्येही चिप्स, कुरकुरे, कॅटबरी यासारखे चिकट पदार्थ खाल्ल्याने मौखिक रोगाची वाढती टक्केवारी सर्वांची चिंता वाढवणारी आहे. याबाबद काही खास टिप्स औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना दिल्या आहेत.

World Oral Health Day
जागतिक मौखिक आरोग्य दिन

By

Published : Mar 20, 2022, 7:33 AM IST

Updated : Mar 20, 2022, 2:31 PM IST

औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून युवकांमध्ये गुटखा, तंबाखू, पानसुपारी यासारख्या व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. ज्यास्तवेळ पान सुपारी तोंडात राहिल्याने तरुणांमध्ये मौखिक रोग वाढत आहेत. त्यासोबतच लहान मुलांमध्येही चिप्स, कुरकुरे, कॅटबरी यासारखे चिकट पदार्थ खाल्ल्याने मौखिक रोगाची वाढती टक्केवारी सर्वांची चिंता वाढवणारी आहे. (Special Report On World Oral Day) यामुळे निरोगी आरोग्यासाठी मौखिक आरोग्य जपने गरजेचे असल्याचे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त तज्ञांशी ईटीव्ही भारतचा संवाद

अनेकजन तोंडाची काळजी घेताना हलगर्जी करतात

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त तज्ञांशी साधलेला संवाध. मानवी शरीरासाठी मुख हा महत्वाचा भाग असतो कारण यातून पाणी, हवा अन्न शरिरात जात असते. (How To Keep Mouth Clean) यामुळे एखाद्याला झालेला आजार हा त्याच्या मुखातून प्रतिबिंबीत होतो. त्यामुळे प्रत्येकासाठी मुख हे स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, अनेकजन तोंडाची काळजी घेताना हलगर्जी करताना दिसतात. यामुळे अनेक आजार होताना दिसत आहेत. यासाठी दिवसातून दोनवेळा प्रत्येकाने तोंडाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे कृतीम दंतचिकित्सक डॉ. किशोर महाले सांगतात.

मुख कर्करोग वाढले -

गेल्या काही दिवसांपासून नागरीकांमध्ये पान सुपारी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या सुपारी पासून तयार होत असलेला गुटख्याची खरेदी केली जाते. (Information On How To Keep Teeth Clean) राज्यात बंदी असलेला गुटखा आता पान ठेल्यावरच नाही तर किराणा दुकात देखील गुटका, तंबाखू, सिगारेट सारखे पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे. कुटुंबीयांना काही माहिती होऊ न देता ही मुले घरातील वडीलधार्‍या मंडळींचे अनुकरण करून बघतात. मात्र, त्यानंतर त्यांना ती नशा हवी-हवीशी वाटू लागले तेव्हा ती मुलं व्यसनांच्या जाळ्यात ओढली जातात. यातून कर्करोगांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.

अशी घ्या काळजी

  • दोन वेळेस ब्रश करावे.
  • लिंबाच्या काडीने केल तरी चालेल.
  • वर्षात दोन वेळा तपासणी करुन घ्यावी.
  • लहान मुलांना झोपतांना दुध पाजून झोपी घालू नये.
  • झोपण्या अगोदर पाण्याची गुळणी करावी.
  • तोंडाची नियमीत स्वच्छता ठेवावी.

नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज -

गुटखा, खर्रा खाल्याने आणि धुम्रपान केल्याने कर्करोग होतो, या बाबतची माहिती ही शाळा महाविद्यालयातून दिली जाते. (Consequences of Smoking) मात्र, ज्या प्रमाणात या विषयाची जनजागृती केली जायला हवी, तेवढी माहिती देण्यात येत नाही. खर्रा तंबाकूचे सेवन केल्याने व्यसन करणार्‍या व्यक्तीला तोंड उघडणे देखील कठीण जात असल्याचा समस्या वाढत आहेत. याकडे देखील व्यसन करणार्‍या प्रत्येकाचे लक्ष जनजागृतीच्या माध्यमातून वेधणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा -नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी बातमी; प्रत्यक्ष साक्षीदाराने दोन शूटरला ओळखले!

Last Updated : Mar 20, 2022, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details