महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Untimely Rain Vidarbha : विदर्भाला अवकाळीचा फटका, पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट... - अवकाळी पाऊस आणि गारपिटी नागपूर

विदर्भातील ( Vidarbha ) अमरावती, वर्धा आणि नागपूरसह इतरही ( Amravati, Wardha and Nagpur Rain ) जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले सर्वच पिक जमिनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा ( ETV Bharat Special Report ) हा विशेष रिपोर्ट.

अवकाळीचा फटका
अवकाळीचा फटका

By

Published : Jan 13, 2022, 8:45 PM IST

मुंबई -विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ( Untimely Rain and Hail ) शेती पिकांचे मोठे नुकसान ( Major Damage to Agricultural Crops ) झाले आहे. यात विदर्भातील ( Vidarbha ) अमरावती, वर्धा आणि नागपूरसह इतरही ( Amravati, Wardha and Nagpur Rain ) जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले सर्वच पिक जमिनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा ( ETV Bharat Special Report ) हा विशेष रिपोर्ट.

शेती पिक नुकसानीवरिल ईटीव्ही भारतचा रिपोर्ट
  • नागपूर जिल्ह्यात झालेले नुकसान

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार जवळपास ७ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. ८ हजार ३३४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी महसूल यंत्रणेला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रामटेक, सावनेर, नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी, या तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहेत. शिवाय जिल्ह्यात झालेला नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

  • अमरावती जिल्ह्यातही मोठे नुकसान

हवामान विभागाने पूर्व आणि पश्चिम विदर्भात 8 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत पावसासह गारपीट अंदाज व्यक्त केला असताना तो खरा ठरला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावस झाला. यात मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावात गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. गारपिटीमुळे या परिसरातील कांदा पिकाचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावातील घराचे छप्पर उडून नुकसान झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिराळा पुसदा राजुरा या गावात गारपिटीने संत्रा पिकाचा बहार गळून पडल्याने संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच, हरभरा आणि भाजीपाला पिक जमीनदोस्त झाले आहे. तर कांदा, कापूस, तूर, हरभरा, गहूसह भाजीपाला पिकाला प्रचंड फटका बसला आहे. दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छप्पर उडून गेल्याने अनेकांचे संसार देखील उघड्यावर आले आहेत.

  • वर्ध्यातही गारपिट

जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील लाडेगाव, माठोडा बेनोडा तसेच पिंपळखुटा भागात झालेल्या गारपिटीत घर आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाढोणा, गुमगाव गावांमध्ये काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली. काही भागात गारांचा खच साचलेला पाहायला मिळाला. यासोबत आष्टी तालुक्यातील खडकी परसोडातही गारपीट झाली. कारंजा तालुक्यात सेलगाव ठाणे, राजनी या गावात गारपीट झाली असून संत्रा बागा गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

हाता तोंडाशी आलेला पिक क्षणात पावसाने हिरावला आहे. अनेक शेतकऱ्यांना यात लाखोंचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करुन भरवी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा -Heavy Rain Amravati : ...अन् शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले मंत्री बच्चू कडू

ABOUT THE AUTHOR

...view details