छिंदवाडा (मध्य प्रदेश) -ईटीव्ही भारत बालवीर या मालिकेचा एक भाग म्हणून, आम्ही तुम्हाला छिंदवाड्याच्या सोना-सारा सिस्टर्स बँडमधील सोना आणि सारा यांची ओळख करून देतो. ज्यांचं बोलणं सफाईदार नाही. परंतु त्यांच्या हातातून सूरांची जादू पाहण्यास मिळते. चार वर्षांचा ड्रमर आणि सात वर्षांचा पियानो वादक यांची जुगलबंदी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.
छिंडवाड्याचा सोना-सारा सिस्टर्स बँड! 3 वर्षाच्या मुलींनी साकारले वडिलांचे स्वप्न
छिंदवाडा येथे पोलिसात नोकरी करणाऱ्या अनिल विश्वकर्मा यांनी तिसर्या वाढदिवसानिमित्त त्यांची मोठी मुलगी सोना विश्वकर्मा यांना पियानो भेट दिले. खरंतर अनिल विश्वकर्मा यांना संगीताची आवड आहे, पण ते कधीही संगीत शिकले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलींना संगीत शिकवायचे होते. वडिलांच्या प्रेरणेवर मुलीनेही आपले स्वप्न साकार करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या काही महिन्यातच मोठी मुलगी पियानो वाजवायला शिकली. नंतर जेव्हा दुसरी मुलगी सारा 3 वर्षांची झाली. तेव्हा अनिलने तिला एक ड्रम भेट दिला आणि सारा देखील अवघ्या 6 महिन्यांत ड्रमवर आपले हात बसविले.
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी सुरू केले गायन
सोना आणि सारा या दोघी बहिणींनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी गायनाला सुरुवात केली. सोना सध्या 7 वर्षांची असून ती इयत्ता दुसरीत शिकत आहे. तर त्याची धाकटी बहीण सारा 4 वर्षांची आहे. जी यूकेजीमध्ये शिकते. दोन्ही बहिणी रोज ३ तास घरी संगीताचा सराव करतात.
स्वत:ला केले सिद्ध -
सारा सिस्टर्स बँडने आता तिच्या बँडला सोना-सारा सिस्टर्स बँड (Sona-Sara Sisters Band) असे नाव दिले आहे. जेणेकरून या दोन्ही बहिणी एकरूप राहतील. मुलींची संगीताची आवड पाहून वडिलांनी त्यांच्यासाठी संगीत शिक्षकाचीही नियुक्ती केली आहे. जो त्यांना सतत संगीत शिकवत आहे. लॉकडाऊनचा वापर, दोन्ही बहिणींची यशस्वी जुगलबंदी, सारा-सोना यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये दोघी बहिणी सतत सराव करत असत. त्यांनी लॉकडाऊनचा योग्य वापर केला. दैनंदिन कामानंतर त्या अनेकदा दिवसभरात सराव करत असे आणि घरातील सदस्यांचे मनोरंजनही करत असे. यामुळे त्यांनी गायन आणि संगीतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
समाज माध्यमातून केली सुरुवात -
सुरुवातीला दोन्ही मुलींनी सोशल मीडियावरून पियानो आणि ड्रम वाजवायला सुरुवात केली. हळूहळू, जेव्हा मुलींना वाद्य समजले त्यानंतर संगीत शिक्षक नियुक्त केले गेले. जे आता घरी सारा आणि सोनाला संगीताचे धडे देतात. सोना-सारा सांगतात की संगीत शिक्षक आठवड्यातून एकदा येतात आणि त्यांना असाइनमेंट देऊन जातात आणि त्यावर नियमित रियाज त्या करतात. संगीताच्या दुनियेत नाव कमवण्यासोबतच तिला एक चांगली व्यक्ती बनायचे आहे. तीने अनेक स्टेज शो केले आहेत. अनेक संस्था केल्या आहेत. मोठी बहीण सोना विश्वकर्मा या पियानो वाजवण्यासोबतच उत्तम गायिका आहेत. सोना मध्य प्रदेश स्थापना दिनानिमित्त आयोजित कॉर्न फेस्टिव्हलसह अनेक कार्यक्रमांमध्ये सोनाने तिचे सादरीकरण केले आहे. तिला अनेक संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. तर लहान बहीण साराने 15 ऑगस्ट दरम्यान एक स्टेज शो देखील केला आहे.
हेही वाचा -डॉक्टर वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं, मुुलीने मांडली कुटुंबाची व्यथा; ईटीव्ही भारत'चा आढावा