महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

exclusive interview Supriya Jatav : यूएसए कराटे स्पर्धेत सुप्रिया जटावने मिळविले सुवर्णपदक; ठरली देशातील पहिली कराटेपट्टू

सुप्रिया यांनी आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय सुवर्ण, 22 राष्ट्रीय सुवर्णांसह 37 पदके जिंकली आहेत. त्यापैकी 12 पदके केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकली आहेत. सुप्रिया यांना एकलव्य आणि विक्रम पुरस्कारही ( Supriya Jatav success in Karate ) मिळाले आहेत. 2015 मध्ये विक्रम पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. सुप्रिया यांनी सांगितले की, 2002 मध्ये साई (SAI) धारसाठी निवड झाली होती. येथे त्यांची प्रशिक्षक जयदेव शर्मा यांची भेट ( coach Jaydev Sharma ) झाली.

यूएसए कराटे स्पर्धेत सुप्रिया जटावने मिळविले सुवर्णपदक
यूएसए कराटे स्पर्धेत सुप्रिया जटावने मिळविले सुवर्णपदक

By

Published : May 5, 2022, 5:01 PM IST

हैदराबाद - अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या यूएसए कराटे चॅम्पियनशिपमध्ये उत्तर प्रदेशच्या सुप्रिया जाटवने आश्चर्यकारक ( Supriya Jatav success in USA ) कामगिरी केली आहे. सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकून सुप्रियाने राज्याचेच नव्हे तर ( USA Karate Championships ) देशाचे नाव उंचावले आहे. अशी कामगिरी करणारी सुप्रिया देशातील पहिली महिला कराटेपटू ठरली आहे. सुप्रिया जाटव यांनी ईटीव्ही भारत सोबत यशोगाथा ( Supriya Jatav etv bharat interview ) कथन केली आहे.

सुप्रिया यांनी आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय सुवर्ण, 22 राष्ट्रीय सुवर्णांसह 37 पदके जिंकली आहेत. त्यापैकी 12 पदके केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकली आहेत. सुप्रिया यांना एकलव्य आणि विक्रम पुरस्कारही ( Supriya Jatav success in Karate ) मिळाले आहेत. 2015 मध्ये विक्रम पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. सुप्रिया यांनी सांगितले की, 2002 मध्ये साई (SAI) धारसाठी निवड झाली होती. येथे त्यांची प्रशिक्षक जयदेव शर्मा यांची भेट ( coach Jaydev Sharma ) झाली. त्यांनी सुप्रिया या खेळाच्या प्रत्येक बारकाव्याची ओळख करून दिली. 2006-07 मध्ये भोपाळमध्ये एमपी कराटे अकादमीची स्थापना झाली. तेव्हा प्रशिक्षक जयदेव यांना मुख्य प्रशिक्षक करण्यात आले. त्यानंतर सुप्रियाही या अकादमीत आल्यानंतर तेव्हापासून खेळत आहेत.

सुप्रिया जाटव यांचे वडील लष्करात होते. आता ते निवृत्त झाले आहेत. यामुळेच शिस्त फार पूर्वीपासून त्यांच्या आयुष्याचा भाग बनली होती. त्या सहा वर्षांची असताना त्यांच्या वडिलांनी सुप्रियाला ग्वाल्हेरमध्ये कराटेमध्ये प्रवेश मिळवून दिला. सुप्रिया जाटव यांनी ईटीव्ही भारतशी केलेल्या संवादातील काही अंश...

यूएसए कराटे स्पर्धेत सुप्रिया जटावने मिळविले सुवर्णपदक

आशियाई चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी- सुप्रिया जाटव यांचा यूएसए कराटे चॅम्पियनशिपमधील प्रवास कसा होता असे विचारले असता त्या म्हणाल्या, की, हे त्यांचे पहिले सुवर्णपदक नाही. 2019 मध्ये एलिट विभागात सुवर्णपदक जिंकले आहे. त्यादरम्यान त्या पदक जिंकणाऱ्या देशातील पहिल्या कराटेपट्टू ठरल्या आहेत. दुसऱ्या यूएसए ओपन चॅम्पियनशिप 2022 मध्ये चांगला अनुभव मिळाला आहे. आशियाई चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. कोरोनानंतर सुप्रिया यांची ही पहिलीच चॅम्पियनशिप आहे.

सुप्रिया जटावने मिळविले सुवर्णपदक

कोरोनाच्या संकटात अडचणींचा सामना-कोरोनाच्या काळात काही अडचण आली असली, तरी त्यांनी धैर्याने त्याचा सामना केला. सुप्रिया म्हणाल्या, की पदक मिळाल्यानंतर लोक खूप अभिनंदन करत आहेत. याचा खूप आनंद होत आहे. सुप्रिया यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात खूप तणावात होत्या. कोरोनाचा सामनाही करावा लागला. त्यादरम्यान खूप त्रास सहन करावा लागला. पण त्यांनी सगळ्यांचा सामना केला. त्यांनी सांगितले की, कैरो चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. जुलैमध्ये त्या तिथे जाणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये खेळण्यासाठी त्यांची निवडही झाली आहे.

मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण-विशेषत: देशातील महिला खेळाडू आणि कराटेबद्दल सुप्रिया म्हणाल्या, की महिलांसाठी स्वसंरक्षण खूप महत्त्वाचे आहे. महिलांनी मार्शल आर्ट शिकले पाहिजे. नेहमी तंदुरुस्त असावे. त्यांनी सांगितले की, त्या देशातील सरकारी आणि खासगी अशा कॉलेजेस आणि शाळांमध्ये मोफत कराटे शिकवितात. यामुळे देशातील महिलांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची इच्छा-सुप्रिया जाटव म्हणाल्या, की यूपीमध्ये कराटे खेळाला प्रोत्साहन द्यायचे आहे. यूपीच्या पोलीस क्वार्टरमध्ये कराटेची व्यवस्था असावी. तिथे अधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी, अशी सुप्रिया यांची इच्छा आहे. त्याचवेळी त्या म्हणाले की, यूपीमध्ये कराटे इन्स्टिट्यूटही उघडण्यात याव्यात. चांगले पद मिळावे आणि मी तिथे प्रशिक्षक व्हावे.
हेही वाचा-Unique Marriage In Bihar : 36 इंच वराचा 34 इंच वधूबरोबर विवाह; सेल्फी घेण्याकरिता उडाली झुंबड

हेही वाचा-हरियाणातून दहशतवादी शस्त्रसाठ्यासह ताब्यात, नांदेडमधील धुमाकुळीचा उधळला डाव

हेही वाचा-Prashant Kishore PC: तुर्तास पक्ष नाही! वाचा, पत्रकार परिषदेत काय म्हणाले प्रशांत किशोर

ABOUT THE AUTHOR

...view details