आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -
14 राज्यात लोकसभेसाठी तीन व विधानसभेच्या 30 जागांसाठी आज पोट निवडणूक -
नवी दिल्ली - 14 राज्यात लोकसभेसाठी तीन व वेगवेगळ्या राज्यातील विधानसभेच्या ३० जागांसाठी आज पोटनिवडणुका होणार आहेत. यातील अनेक निवडणुका अटीतटीच्या होत आहे मात्र याचा राज्यातील सरकारांवर परिणाम होणार नाही. मात्र आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषगांने राजकीय पक्षांसाठी या निवडणुका महत्वपूर्ण असणार आहेत.
पंतप्रधान मोदी इटली दौऱ्यावर.. आज पोप फ्रान्सिस यांची घेणार भेट
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 ऑक्टोबर) कॅथोलिक ईसाई धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रांसिस यांची भेट घेणार आहेत. पीएम मोदी सध्या पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. मोदी आदी इटलीत जी20 देशांच्या बैठकीत भाग घेतील व त्यानंतर ग्लास्गोमध्ये ग्लोबल वार्मिग परिषदेत भाग घेतील.
अमित शाह आज उत्तराखंड दौऱ्यावर.. मुख्यमंत्री घसियारी कल्याण योजनेचा शुभारंभ
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुख्यमंत्री घसियारी कल्याण योजनेचा त्यांच्याहस्ते शुभारंभ होणार आहे. याची भाजपने पूर्ण तयारी केली आहे.
Aryan Khan Case : आर्यन खानची आज २६ दिवसानंतर तुरुंगातून सुटका, मन्नत वर जल्लोषाची तयारी
मुंबई - आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामिनावर सुटका केल्याचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. या आदेशाची प्रमाणित प्रत वेळेत तुरुंगात पोहचली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला. त्यामुळे शुक्रवारची रात्र देखील आर्यनला तुरुंगामध्ये घालवावी लागली. आज सकाळी आर्यन तुरुंगातून बाहेर येणार आहे. तुरुंग अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीत आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरू होणार चित्रपटगृहे, मल्टिफ्लेक्स
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध कमी केले आहेत. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (DDMA) ने नवीन नियमावली जारी करत काही निर्बंधातून सूट दिली आहे. चित्रपटगृहे व मल्टीप्लेक्स १०० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत.
समीर वानखेडे प्रकरणात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद -
मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार आहे.
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -
अभिनेत्री जुही चावलाच्या 'या' एका चुकीमुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला
मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये अटकेत आहे. आर्यन खानला उच्च न्यायालयात जामीन मिळाला तरीदेखील आजची रात्र आर्यनला जेलमध्येच राहावे लागत आहे. आर्यन खानची जमीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात पोचली तेव्हा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्यामुळे आर्यनला आजची रात्र जेलमध्ये राहवे लागणार आहे.
हे ही वाचा -अभिनेत्री जुही चावलाच्या 'या' एका चुकीमुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम एका रात्रीने वाढला
पोपटाचा धंदा माझा नाही.. नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री
नागपूर - पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करण्याचं काम करतात त्यामुळे नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही, असा पलटवार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ते नियोजित बैठकीसाठी गोंदियाला जात असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एसीबीच्या कारवायांवर टीका केली.
वाचा सविस्तर - पोपटाचा धंदा माझा नाही नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री
2020 मध्ये सरासरी रोज 418 जणांची आत्महत्या, देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात!
नवी दिल्ली -देशातील आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वर्ष 2020 मध्ये सरासरी रोज 418 व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामधील 10,677 लोक हे कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर महाराष्ट्रातील आत्महत्येचे प्रमाण देशात सर्वाधिक राहिल्याचे दिसून आले आहे.
वाचा सविस्तर - 2020 मध्ये सरासरी रोज 418 जणांची आत्महत्या, देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात!
धक्कादायक... वारंगणांच्या वस्तीत सापडले दोन गुप्त भुयार, अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी व्हायचा उपयोग
नागपूर - शहरातील सर्वात बदनाम वारंगणांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या कुप्रसिद्ध गंगा जमुना येथे पोलिसांनी दोन भुयार शोधून काढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी राजस्थान येथील एका तरुणीने गंगा जमुना वस्तीतून पळ काढला होता. त्या तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांना भुयारांचा शोध घेतला,तेव्हा हे धक्कादायक वास्तव्य पुढे आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना देखील अटक केली आहे.
वाचा सविस्तर -धक्कादायक... वारंगणांच्या वस्तीत सापडले दोन गुप्त भुयार, अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी व्हायचा उपयोग
कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
बंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार करणऱ्या डॉक्टरांच्या टीमला यश मिळू शकले नाही आणि त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे. ही बातमी मिळताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली आहे.
वाचा सविस्तर -कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
30 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य
वाचा सविस्तर -30 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य