आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -
आर्यन खान आज तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता
मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान प्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत आज येणार असल्याने आर्यन खान आज तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. गेल्या २६ दिवसांपासून आर्यन खान तुरुंगात आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची एनसीबीने दक्षता पथकाकडून आजपासून चौकशी -
मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता पथकाकडून आजपासून चौकशी होणार आहे. दक्षता पथकाने बुधवारी समीर वानखेडे यांची चार तास चौकशी केली. एजन्सीने साईललाही चौकशीसाठी बोलावले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने अलीकडेच दावा केला होता की एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांनी क्रूझ जहाजावरील छापा प्रकरणातील आरोपी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. या आरोपानंतर एनसीबीने दक्षता पथकाची स्थापना केली आहे.
समीर वानखेडेंच्या समर्थनात भाजपचे आज मुंबईत आंदोलन
मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तर त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे. भाजप आज मुंबईत निदर्शने करणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शने होणार आहेत.
समीर वानखेडे प्रकरणात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद -
मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे.. आजपासून लाल परी नियमित धावणार
मुंबई -गेले अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारने मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे आजपासून एसटीच्या फेऱ्या नियमित होणार आहेत.
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -
अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल
चेन्नई -रजनीकांत यांना गुरूवारी त्यांच्या शरीराच्या नियमित तपासणीसाठी चेन्नईच्या अलवरपेट येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील २४ तास ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील.
सविस्तर वाचा -अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल