वडोदरा - कोरोनाचा नवीन एक्सई व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण भारतात आढळून आला आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये या व्हेरियंटची नोंद करण्यात आली आहे. मुंबईहून वडोदरात आलेल्या एका वृद्धाला एक्सई व्हेरियंटची लागण झाली ( XE Variant In Gujrat ) आहे.
मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्य गुजरातमध्ये गेले होते. त्यांनी वडोद्यातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे दोन्ही वृद्ध दाम्पत्यांनी खासगी लॅबमध्ये चाचणी केला. त्यामध्ये महिलेचा निगेटिव्ह तर वृद्धाचा अहवाल एक्सई पॉझिटिव्ह आला आहे.
वडोदरा महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. देवेश पटेल यांनी सांगितले की, 12 मार्च रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथील वृद्ध दाम्पत्य वडोदऱ्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांनी स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर ताप आल्याने त्यांच्यावर गोत्री रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते मुंबईला परते आहे. त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेच जिनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठवले आहे.
हेही वाचा -Corona Vaccine : मोठी बातमी, कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लसीच्या किंमतीत मोठी घट