शिमला- जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही, त्यातच सर्वच जण कोरोना लसीची वाट पाहात आहेत. कारण या महामारीपासून सुटका मिळाली पाहिजे. अशा परिस्थितीत हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीति येथील थोरंग गावातील एका व्यक्तीने कोरोना लसीशिवाय त्यावर मात करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. ४३ नागरिकांच्या थोरंग गावातील भूषण ठाकूर ही एकमेव व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे केवळ मास्क आणि सामाजिक अंतराने कोरोनाला दूर ठेवणे शक्य होत असल्याचे उदाहरण भूषण ठाकूर यांनी दाखवून दिले आहे.
म्हणून त्यांचा अहवाल निगेटिव्ह-
थोरंग गावातील भूषण ठाकूर यांना सोडून गावातील सर्वच 42 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गावात सर्वचजण कोरोना बाधित असताना देखील कोरोनाचा विषाणू ठाकूर यांना धोका पोहोचवू शकला नाही. विशेष म्हणजे भूषण ठाकूर यांच्या घऱातील सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एकमेव भूषण ठाकूर यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे गावत सरकारने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जी नियमावली घालून देण्यात आली होती, त्या नियमांचे भूषण ठाकूर काटेकोरपणे पालन करत होते. ठाकूर हे नियमितपणे मास्कचा वापर करत होते, तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करून काळजी घेत होते.
कोरोनाला सहजतेने घेऊ नका-