पाटणा :मणिपूरनंतर भाजपने जेडीयूला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमधील 12 हून अधिक JD(U) नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिकपणे प्रवेश ( Entire unit of JDU Dadra Nagar Haveli merged with BJP ) केला. जनता दल युनायटेड (JDU) नेते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले सदस्य भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले.
16 JDU नेते भाजपमध्ये सामील झाले : नितीश कुमार यांच्या पक्ष JDU चे हे तिसरे युनिट आहे, ज्याचे नेते JD(U) ने भाजपपासून वेगळे झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील जेडीयू नेते भाजपमध्ये सामील झाले ( JDU Leader Join BJP ) होते. भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांनी सांगितले की, केंद्रशासित प्रदेशातील 16 JD(U) नेते रविवारी पक्षात सामील झाले. यापूर्वी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.