चेस्टर ली स्ट्रीट: भारतीय महिला क्रिकेट संघ ( Indian womens cricket team ) फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरला. ज्यामुळे पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने त्यांचा नऊ गडी राखून पराभव केला ( England defeated Indian womens team by 9 wickets ). इंग्लंडची कर्णधार एमी जोन्सने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करत, लेगस्पिनर सारा ग्लेनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला 7 बाद 132 धावांवर रोखले. सलामीवीर सोफिया डंकलेच्या ( Opener Sophia Dunkley ) नाबाद 61 धावांच्या जोरावर इंग्लंडने 13 षटकांत 1 बाद 134 धावांवर सहज विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत लवकरच आघाडी घेतली.
लेगस्पिनर सारा ग्लेनची शानदार गोलंदाजी -
ग्लेनने चार षटकांत 23 धावा देत चार बळी ( Brilliant bowling by legspinner Sarah Glenn ) घेत भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अडचणीत ठेवले. भारताचा एकही फलंदाज शेवटपर्यंत खेळू शकला नाही. भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्माने 29 चेंडूत सर्वाधिक 24 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधना 23 तर कर्णधार हरमनप्रीत कौर 16 चेंडूत 20 धावा करून ग्लेनच्या गोलंदाजीवर बाद झाली. यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने चांगली सुरुवात करत 12 चेंडूत 16 धावा केल्या, मात्र तिला त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही आणि मध्यमगती गोलंदाज फ्रेया डेव्हिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.
भारतीय सलामीवीरांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही -