महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दारूप्रकरणी पाटणा येथून 2 डॉक्टर आणि 6 इंजिनियरला अटक - बिहार न्यूज

पाटणामध्ये पोलिसांनी बेकायदा दारूप्रकरणी 147 ठिकाणी छापे टाकले. सॉफ्टवेअर इंजिनिअर-महिला डॉक्टरसह 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी 100 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

engineer-doctor-arrested-by-patna-police-in-liquor-connection
बेकायदा दारूप्रकरणी पाटणा येथून 2 डॉक्टर आणि 6 इंजिनियरला अटक

By

Published : Nov 21, 2021, 1:40 PM IST

पाटणा - दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये (Bihar) विषारी दारूने (Liquor) कहर केला आहे. ऐन दिवाळीत अनेक कुटूंबांच्या आयुष्यात अंध:कार पसरला आहे. मागील तीन दिवसांत विषारी दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दारू आणि मद्यपींच्या शोधासाठी पोलीस राज्यभर छापे टाकत आहेत. 48 तासांत एकट्या राजधानी पाटण्यात 147 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दारूबंदी प्रकरणात आणखी 100 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये, 110 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाटणा पोलिसांचे पथक सातत्याने छापे टाकत होते. हॉटेल, मुसहरी, गुमटी, लॉज, वाहन तपासणी आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. छाप्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि पुरुष डॉक्टर, मोठ्या कंपन्यांमधील अभियंते, सरकारी कर्मचारी, अंमली पदार्थांचे व्यसनी आणि इतर अनेक व्यावसायिकांचा समावेश आहे. आता या सर्व हायप्रोफाईल नोकऱ्यांवर काम करणाऱ्यांना पाटण्यातील बेऊर जेलची हवा खावी लागणार आहे.

बेकायदा दारूप्रकरणी पाटणा येथून 2 डॉक्टर आणि 6 इंजिनियरला अटक

पाटणातील कंकरबाग पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ आर एन सिंग मोडजवळील हॉटेल फॉर्च्युनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचे लग्न सुरू होते. लग्नात सहभागी होण्यासाठी त्याचे सहा 'सॉफ्टवेअर इंजिनीअर' मित्र आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कंकरबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी रविशंकर कुमार यांनी सर्व ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ना तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अचानक पोलिसांच्या कारवाईमुळे लग्नसराईच्या आनंदी वातावरणात शोककळा पसरली होती.

पोलिसांनी डाकबंगला चौकात असलेल्या हॉटेल जिंजरच्या खोली क्रमांक 506 मध्ये छापा टाकून दोन डॉक्टरांना अटक केली. यात भागलपूरचे रहिवासी शैलेंद्र शेखर आणि रांची येथील महिला डॉक्टर आहे. या महिला डॉक्टरची महाराष्ट्रात नियुक्ती आहे. दोघेही पाटणा एम्समध्ये मुलाखत देण्यासाठी आले होते. या छाप्यात डॉ.शैलेंद्र शेखर याच्याकडून ब्रँडेड विदेशी दारूने भरलेली बाटली सापडली. यानंतर पोलिसांनी शैलेंद्रला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details