नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला आग लागल्याने(engine of Indigo plane caught fire) स्पार्कमुळे विमान दिल्ली विमानतळावरच आपत्कालीन स्थितीत थांबवावे (plane caught fire at Delhi airport) लागले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानात सुमारे 184 हवाई प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते असे सांगण्यात येत आहे.
विमानतळावरच इंडिगो विमानाच्या इंजिनला लागली आग पर्यायी विमानाची व्यवस्था :इंडिगो एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E-2131 रात्री दिल्लीहून बंगळुरूला निघाले होते. तांत्रिक बिघाडामुळे त्यांना टेक ऑफ दरम्यान दिल्ली विमानतळावर परत थांबावे लागले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सर्व हवाई प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली (Indigo plane caught fire) होती.
इंजिनला स्पार्कमुळे आग :या प्रकरणाची पुष्टी करताना डीसीपी विमानतळ तनु शर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 10:08 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय नियंत्रण कक्षाला सीआयएसएफ नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की फ्लाइट क्रमांक 6 ई-2131 च्या इंजिनला स्पार्कमुळे आग लागली. हे विमान दिल्लीहून बंगळुरूला जात होते. यात एकूण १८४ हवाई प्रवाशांसह ७ क्रू मेंबर्स उपस्थित (Plane Caught Fire) होते.
तात्काळ उड्डाण रद्द :विमान उड्डाण रनवेवर उड्डाण करण्यासाठी धावू लागले होते, तेव्हाच तांत्रिक समस्येमुळे विमानातून ठिणगी पडू लागली. चालकाने तात्काळ उड्डाण रद्द केले. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या विमानाने बेंगळुरूला पाठवण्यात (Indigo plane) आले.