महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स - सोनिया गांधींना ईडीचे समन्स

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी व सोनिया गांधी यांना समन्स बजावले. ( Enforcement Directorate summon rahul gandhi )

National Herald Case
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स

By

Published : Jun 1, 2022, 2:07 PM IST

Updated : Jun 1, 2022, 2:24 PM IST

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स ( Enforcement Directorate summon rahul gandhi ) बजावले, जे 2015 च्या आधी तपास यंत्रणेने बंद केले होते. ( National Herald Case )

दरम्यान, काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी भाजप सरकार विरोधकांना दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. "नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र 1942 मध्ये सुरू झाले, तेव्हा ब्रिटीशांनी ते दडपण्याचा प्रयत्न केला. आज मोदी सरकारही तेच करत आहे आणि यासाठी ईडीचा वापर केला जात आहे," असे ते म्हणाले.

सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले - ईडीच्या समन्स नंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, हुकूमशाही सरकार घाबरले आहे, त्यामुळे बदला घेतला जात आहे. ते म्हणाले की, सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया आणि राहुल यांना समन्स पाठवले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये काँग्रेसने राहुल आणि सोनियांना पक्ष निधीतून 90 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. असोसिएट जर्नल्सची २ हजार कोटींची मालमत्ता मिळवणे हा त्याचा उद्देश होता. त्यासाठी गांधी परिवाराने केवळ ५० लाखांची तुटपुंजी रक्कम दिली होती.

हेही वाचा -केकेच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गाताना स्टेजवरुन असा निघाला होता गायक

Last Updated : Jun 1, 2022, 2:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details